राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : 'या' राज्यांच्या खेळाडूंना सुवर्णपदके

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा :  'या' राज्यांच्या खेळाडूंना सुवर्णपदके

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनच्या (Maharashtra Taekwondo Association) वतीने आणि तायक्वांदो फेडेरेशन ऑफ इंडिया (Taekwondo Federation of India) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मास्टर किराश बहेरी वर्ल्ड तायक्वांदो कॉर्डिनेटर फॉर इंडिया (Master Kirash Baheri World Taekwondo Coordinator for India) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल (आबा ) झोडगे, महासचिव संदीप ओंबासे आणि प्रमुख पंच दिनेश कुमार (पौडीचेरी) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....

नाशिकच्या स्व. मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे आयोजित या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या गेलेल्या स्पर्धामध्ये महाराष्ट्र, हरयाणा, कर्नाटक, तेलंगणा यांच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सुवर्णपदके मिळविली.

मुलांच्या ५८ किलो वजनी गटात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत हरियाणाच्या प्रशांत राणा याने महाराष्ट्राच्या स्वराज शिंदेंवर दोन गुणांनी मात करून सुवर्णपदक पटकावले.

तर ६८ किलो गटात तेलंगणाच्या रुपालू पृथ्वीराजने महाराष्ट्राच्या मनीष चव्हाणचा पराभव करून सुवर्ण पदक मिळविले. मुलींमध्ये हरयाणाच्या दिक्षा शर्मा, महाराष्ट्राची निषिक्ता कोतवाल, कर्नाटकची दिक्षा राजगोपाल यांनी आपआपल्या गटात चांगला खेळ करून सुवर्णपदक आपल्या नावे केले.

या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना इंडिया तायक्वांदो (India Taikwando) च्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन (Champion of Champion) च्या अंतिम पर्वत खेळण्याची संधी मिळेल.

या अंतिम स्पर्धा तायक्वांदो फेडेरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथेच ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत.

आजच्या दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धेचे निकाल :

मुले - ५८ किलो गट : १) प्रशांत राणा (हरयाणा) - सुवर्ण पदक, २) स्वराज शिंदे (महाराष्ट्र) - रौप्य पदक, ३) रुद्र नारायण (ओरिसा) आणि हेत पटेल (गुजराथ) - संयुक्त ब्राँझ पदक

६८ किलो गट : १) रुपालू पृथ्वीराज (तेलंगणा ) - सुवर्ण पदक, २) मनीष चव्हाण (महाराष्ट्र) - रौप्य पदक, ३) नासेर डी गौडा (कर्नाटक) आणि विनीत चौधरी (हरयाणा ) - संयुक्त ब्राँझ पदक

८० किलो गट : १) कानिफनाथ पोकळे (महाराष्ट्र) - सुवर्ण पदक, २) साहिल सूर्यवंशी (महाराष्ट्र) - रौप्य पदक, ३) आशिष कुमार (हरयाणा) आणि श्लोक वरुडे ( महाराष्ट्र) - संयुक्त ब्राँझ पदक

८७ किलो गट : १) दुष्यन्त नंदाल (हरयाणा) - सुवर्ण पदक, २) रणजित पाटोळे ( महाराष्ट्र) - रौप्य पदक, ३) असिन सिंग सॊदी (महाराष्ट्र) आणि रिसे (हरयाणा) - संयुक्त ब्राँझ पदक

मुलीं - ४६ किलो गट : १) दिक्षा शर्मा (हरयाणा) - सुवर्ण पदक, २) शहनाज परवीन (दिल्ली) - रौप्य पदक, ३) कनिष्का मथपाल (उत्तराखंड) आणि अस्था तन्वर (दिल्ली) - संयुक्त ब्राँझ पदक

५३ किलो गट : १) निषिक्ता कोतवाल (महाराष्ट्र) - सुवर्ण पदक, २) शिवाणी बेहिलारे (महाराष्ट्र) - रौप्य पदक, ३) इशा शहा आणि तन्वी पोस्तुरे (दोघीही महाराष्ट्र) - संयुक्त ब्राँझ पदक

६२ किलो गट : १) दिक्षा राजगोपाल (कर्नाटक ) - सुवर्ण पदक, २) नंदिनी अनुने (महाराष्ट्र) - रौप्य पदक, ३) ख़ुशी जी. के. (कर्नाटक) आणि ऋतुजा गोरे (महाराष्ट्र) - संयुक्त ब्राँझ पदक

७३ किलो गट : ऋषीका भावे (महाराष्ट्र) सुवर्ण पदक. .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com