निवेक मैदानावर राष्ट्रीय टेनिस स्पर्धा

निवेक मैदानावर राष्ट्रीय टेनिस स्पर्धा

सातपूर | प्रतिनिधी Satpur

शहरातील अद्यायावत टेनिस कोर्ट (tennis court) उभारलेल्या निवेकच्या मैदानांवर (Niwec Ground) राज्यस्तरीय एमएसएलटीए (MSLTA) व निवेक यांच्या माध्यमातून ऑल इंडीया रँकींग टॅलेंट सीरीज स्पर्धा (All India ranking series competition) घेण्यात आल्या. या स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे आयोजन निवेक क्लबच्या निवेक टेनीस अकादमीद्वारे करण्यात आले आहे...

ही स्पर्धा राष्ट्रीय नामांकन स्पर्धा असून भारतातील विविध राज्यातून टेनिस खेळाडू यात सहभागी झालेले आहेत. निवेक टेनिस कोर्टवर आयोजित करण्यात आलेल्या या ऑल इंडिया रँकींग टॅलेंट सिरीज स्पर्धेचे उदघाटन स्पर्धेचे प्रायोजक सुर्यकिरण उद्योगाचे संचालक प्रविण पाटील (Suryakiran Udyog MD pravin patil) यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी निवेक अध्यक्ष संदिप गोयल (Niwec President Sandip Goyal), उपाध्यक्ष जनक सारडा (Deputy President Janak Sarda), क्रीडा सचिव पंकज खत्री (Sports Secretory Pankaj Khatri), सरचिटणीस रणजित सौंध (Genral Secretory Ranjit Saundh), श्रीकांत कुमावत, कार्यकारीणी सदस्य जितेश वैश्य, शैलेश वैश्य आणि नितीन वागस्कर, टेनीस प्रशिक्षक अपूर्ण रोकडे, अजिंक्य बच्छाव आणि आयटा सुपरवायझर तेजल कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी प्रविण पाटील यांनी स्पर्धाच्या माध्यमातून नाशिकच्या खेळाडूंच्या गूणवत्ता विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com