नाशिकच्या खेळाडूंचे एअर रायफल शूटिंग स्पर्धेत घवघवीत यश

नाशिकच्या खेळाडूंचे एअर रायफल शूटिंग स्पर्धेत घवघवीत यश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बंगळूरू येथे नुकत्याच झालेल्या CISCE इंटरस्कूल नॅशनल स्पर्धेत अशोका युनिव्हर्सल स्कूल, अर्जुन नगर कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी एअर रायफल शूटिंग स्पर्धेत अनेक पुरस्कार मिळवले आहेत...

वैभव गायकवाड याने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात एअर रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. इरा कुलकर्णी हीने एअर रायफल शूटिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात रौप्य पदक पटकावले. श्लोक आहेर आणि अनस सय्यद यांनी एअर रायफल शूटिंग इव्हेंटमध्ये ४ था क्रमांक पटकावला.

रुही देवरेने एअर रायफल शूटिंग इव्हेंटमध्ये ५ वा क्रमांक पटकावला. शाळेला १७ वर्षांखालील मुलांच्या गटातील चॅम्पियनशिप ट्रॉफीसाठी पुरस्कृत करण्यात आले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम रनर अप चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवली.

विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक संदीप पवार यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांची मेहनत आणि समर्पणाचे कौतुक केले. उपप्राचार्य डॉ. प्रिया डिसुझा आणि मुख्याध्यापक प्रमोद त्रिपाठी यांनी यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com