राष्ट्रीय अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकची तनिषा राष्ट्रीय विजेती

राष्ट्रीय अजिंक्यपद  टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकची तनिषा राष्ट्रीय विजेती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केरळमधील अलपूझा (Kerala Alpuza) येथे झालेल्या ८३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद (National Championship) टेबल टेनिस स्पर्धेत (Table Tennis Championship) १७ वर्षाखालील मुलींच्या गटात नाशिकच्या तनिषा कोटेच्याने (Tanisha Kotecha) राष्ट्रीय विजेतेपद मिळविले. तनिशाने अंतिम फेरीत नॅशनल सेन्टर ऑफ एक्ससल्लेन्स बंगालची सुभंक्रिता दत्ताचा (Subhrankrita Datta) ११-६, ११-६,११-५, असा ४-० सहजरीत्या पराभव करत राष्ट्रीय विजेतेपद मिळविले....

तनिषाला साठ हजार रू. रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी उप उपांत्य फेरीत तिने या स्पर्धेतील उत्तर प्रदेशच्या भरत वर्तिका (Bharat Vartika UP) हिचा ११-५, ११-९, ११-४, ११-४ असा सहजरीत्या ४-० ने परभाव करत आपली सुवर्णपदकाची वाटचाल चालू ठेवली. तर उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या जेनिफर वर्गीस (Jenifer vergis) हीचा ११-९, ४-११, ११-५, ८-११, ११-४, १२-१० असा ४-२ ने पराभव करीत अंतिम फेरीतले स्थान निश्चित करत राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तनिशा ही जय मोडक (jay modak) यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. तनीषाला विक्टस या कंपनीने क्रीडा साहित्यासाठी पुरस्कृत केले आहे.

तनिषा ही नाशिकची दुसरी राष्ट्रीय विजेती खेळाडू आहे. मागील वर्षी सायली वाणी हिने १५ वर्षाखालील मुलींच्या गटात राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. या विजयानंतर तनिषा ही राष्ट्रीय मानांकनात अव्वल स्थानावर पोहचली आहे. तिने आतापर्यंत स्पेन, जर्मनी, ऑस्ट्रिया, दोहा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षी हरियाना येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या संघात निवड झाली होती.

तीच्या या यशाबद्दल जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोले, अभिषेक छाजेड, पीयूष चोपडा, राजेश वाणी, राज्य संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस. प्रकाश तुळपुळे, यतिन टिपणीस, संजय कडू, योगेश देसाई, विवेक आळवणी, संजय मोडक यांनी अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com