विश्व ब्रीज स्पर्धेसाठी नाशिकच्या राशी जहागीरदारची निवड

विश्व ब्रीज स्पर्धेसाठी नाशिकच्या राशी जहागीरदारची निवड

नाशिक | प्रतिनिधी Nashik

७ ते १४ ऑगस्टदरम्यान इटली (Italy) येथे ७ व्या विश्व ब्रीज स्पर्धेचे (world bridge championships) आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उपकनिष्ठ गट, कनिष्ठ आणि यूथ गट अशा तीन गटांचा समावेश आहे. उपकनिष्ठ (१६ वर्षे) गटाच्या संघामध्ये नाशिकच्या फ्रवशी इंटरनॅशनल स्कूलची (fravashi international school) खेळाडू राशी सागर जहागीरदार (Rashi Jahagirdar) हिची भारतीय संघात निवड झाली आहे. राशीबरोबर या गटात मुंबईचा पावन गोयल (pawan goyal), कर्नाटकचा कर्तीकेयन मुत्थुस्वामी आणि कोलकाताचा तिर्थराज चक्रवर्ती या खेळाडूंचा भारताच्या संघात समावेश आहे....

राशीने २०१८ च्या करोना प्रादुभावाच्या (Corona Outbreak) काळात ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया (bridge federation of india) यांच्यामार्फत सुरू असलेली ब्रीज पाठशाळा जॉइन केली. तीने ब्रीजचा सखोल अभ्यास केला आणि आंतरराष्ट्रीय कोच अनिरूद्ध सांझगिरी यांच्याकडून सर्व तांत्रिक बाबीची माहिती करून घेतली.

त्यांच्या मार्गदर्शनानुसार, संपूर्ण एकाग्रतेने सतत सराव केला. तीच्या या मेहनतीचा तिला चांगला फायदा झाला. एप्रिल २०२२ ला आयोजित राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत राशीने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून वैयक्तिक प्रकारात दूसरा क्रमांक आणि पेअर प्रकारात तिसरे स्थान मिळविले. या राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगीरीच्या आधारे संपूर्ण भारतातून ४२ खेळाडूंच्या प्राथमिक निवड करण्यात आली होती.

यानंतर झालेल्या शिबिरात राशीने चांगला खेळ करून अंतिम संघामध्ये आपले स्थान पक्के केले. राशीच्या या निवडीबद्दल तिचा फ्रवशी इंटरनॅशनलचे संचालक रतन लथ, मुख्याध्यापक यांनी सत्कार केला तसेच राशीला शुभेच्छा दिल्या. राशीची आई डॉ. विशाखा जहागीरदार स्वतः डॉक्टर आहेत. आईने मला संपूर्ण सहकार्य केल्यामुळे आणि माझ्या शाळेने मला सर्व प्रकारची मदत केल्यामुळे मला हे यश मिळवता आले आहे अशी भावना राशीने व्यक्त केली.

इटलीत आयोजित या ७ व्या विश्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारताच्या संघामध्ये एकूण २२ खेळाडूंचा समावेश असून या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून नाशिकच्या हेमंत पांडे (Hemant Pandey) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रशिक्षक म्हणून अनिरुद्ध सांजगिरी, विनय देसाई, बिंदीया नायडू, सत्यकुमार आयगार आणि केशव सामंत हे असणार आहेत.

ब्रीज हा संपूर्ण बुद्धीचा खेळ आहे. भारताच्या ब्रीज संघाने याआधी वरिष्ठ विश्व स्पर्धेत रौप्य पदक, आशियाई स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि दोन कास्य पदकांची कमाई केली आहे. प्रशिक्षकांनी या खेळाडूंकडून चांगला सराव करून घेतला आहे, त्यामुळे हे खेळाडू भारतासाठी चांगली कामगरी करतील असा विश्वास हेमंत पांडे यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com