आयर्नमॅन स्पर्धेसाठी सज्ज होताय नाशिककर

ट्रायथलॉन स्पर्धेत २५ खेळाडू सहभागी
आयर्नमॅन स्पर्धेसाठी सज्ज होताय नाशिककर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पुढील महिन्यात विविध खेळाडू आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेकडे (Ironman Competition) कूच करणार आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. मुस्तफा टोपीवाला (Dr. Mustafa Topiwala) आणि डॉ. पिंपरीकर स्पोर्ट्समेड टीमतर्फे (Dr pimprikars sportsmed team) ट्रायथलॉन स्पर्धा (Triathlon competition) पिंपळगाव बसवंत येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नाशिकमधील सुमारे २५ खेळाडूंनी सहभाग घेतला...

ट्रायथलॉन स्पर्धा ही आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या सरावासाठी आयोजित करण्यात आली होती. कडवा नदीवर 3 किमी पोहणे, त्यानंतर 110 किमी सायकल आणि 30 किमी धावणे, असे या स्पर्धेचे स्वरूप होते.

स्पर्धेत महिला खेळाडूंसह 17 वर्षे ते 65 वर्षे वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मविप्रचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण गचाळे व छत्रपती पुरस्कार विजेते सुलतान देशमुख यांच्या टीमने या स्पर्धेचे सहकार्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com