नाशिकच्या डॉ नमिता कोहोक बनल्या 'नॅशनल पॉवर लिफ्टर'

नाशिकच्या डॉ नमिता कोहोक बनल्या 'नॅशनल पॉवर लिफ्टर'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या डॉ. नमिता परितोष कोहोक (Dr Namita Paritosh Kohok) सलग दुसऱ्यांदा भारतीय महिला कॅन्सर सरवायव्हर (Survivor) नॅशनल पॉवर लिफ्टर बनल्या आहेत. आज (दि. २७) रोजी कोलकाता(Kolkata) येथे .नमिता कोहोक यांनी नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये ३ सुवर्ण पदक मिळवले. डॉ कोहोक यांनी महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व केले....

त्यांना नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन (National Cha सिनियर ग्रुपमध्ये गोल्ड मेडल, बेस्ट बेच प्रेस साठी गोल्ड मेडल, बेस्ट डेड लिफ्टसाठी गोल्ड मेडल त्यांना मिळाले.

त्यांनी मास्टर कॅटेगरीमध्ये भाग घेतला होता. अम्यच्युअर पॉवरलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या असोसिएशनने नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२२ ही कोलकाता येथे २२ ते २७ मे दरम्यान घेतली.

देशातील १० राज्यांमधील २५० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व मास्टर गटामध्ये डॉ. नमिता कोहोक यांनी केले. त्यांनी अथक परिश्रम व चिकाटीच्या जोरावर ३ सुवर्ण पदकाची कामगिरी केली.

३ महिन्यापूर्वी त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया होऊनही त्यांनी ही कामगिरी केली. डॉ. कोहोक यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांचे गुरू आशय रानडे, गोस्वामी यांना दिले. पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, अफिलिएटेड युनिट ऑफ वर्ल्ड पोवारलिफ्टिंग इंडियाचे आभार मानले.

जर माझ्या परिवाराची साथ मला मिळाली नसती, माझे पती परितोष कोहोक, सासूबाई, मुलगा व आई वडील डॉ. भदाणे यांचे आभार मानणे शब्दात शक्य नाही असे डॉ. कोहोक म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com