नाशिकच्या भावना गवळी महिला क्रिकेटच्या सहप्रशिक्षक व संघ व्यवस्थापक

नाशिकच्या भावना गवळी महिला क्रिकेटच्या सहप्रशिक्षक व संघ व्यवस्थापक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (District Cricket sanghtna Nashik) महिला खेळाडु संघ प्रशिक्षक भावना गवळी (Bhavana Gawali) यांची महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाच्या (Maharashtra woman senior team) सहाय्यक प्रशिक्षक (Assistant Coach) व संघ व्यवस्थापक (Team Manager) पदी  निवड झाली आहे.... 

भारतीय क्रिकेट नियामकमंडळ, बीसीसीआय तर्फे (BCCI) आयोजित एकदिवसीय सामन्यांच्या, बाद फेरीसाठी ही निवड झाली आहे. भावना गवळी मागील वर्षीदेखील महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक होत्या.

महाराष्ट्राच्या माजी क्रिकेटपटु भावना गवळी, गेल्या पंधरा वर्षांपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर नाशिकच्या महिला क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत आहेत. त्या रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल मध्ये ही क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करतात.

1991 ते 1999 दरम्यान त्यांनी महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाबरोबरच, पश्चिम विभागाचे ही प्रतिनिधित्व केले होते . ऑल इंडिया इंडियन युनिवर्सिटी पातळीवर ही त्या क्रिकेट खेळल्या आहेत.

नाशिकच्या माया सोनवणे व प्रियांका घोडके व ईश्वरी सावकार ह्या खेळाडु महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघाच्या सदस्य असून, महाराष्ट्राचा उपांत्य पुर्व फेरीचा सामना १५ नोव्हेंबर ला बंगलोर येथे नियोजित आहे.

या महत्वपूर्ण निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व संघात आनंदाचे वातावरण आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भावना गवळी यांचे अभिनंदन करून उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com