राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा : नाशिकच्या कुशल चोपडाला कांस्यपदक

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा : नाशिकच्या कुशल चोपडाला कांस्यपदक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नुकत्याच इन्दोर येथे झालेल्या मध्यविभाग राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत (National ranking table tennis competition) नाशिकच्या कुशल चोपडाने (Nashik Kushal Chopada) १५ वर्षाखालील मुलांच्या गटात कांस्य पदक (Bronze Medal) पटकावले. उपांत्य पूर्व फेरीत मणिपुरच्या ७ व्या मनांकित ३-२ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला....

परंतु उपांत्य फेरीत त्याला बिगर मानांकित बंगाल (बी) च्या पुनीत बीश्वासने ४-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याचा फायदा उचलत विश्वास या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

या हंगामातील कुशलचे हे तिसरे कांस्य पदक (Bronze Medal) असून तो सध्या जय मोडक (jay modak) यांचे मार्गदर्शनाखाली इन्दोर (Indore) इथेच होणाऱ्या ८३ वी ज़्यूनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची (Junior national championship) तयारी करत आहे.

त्याच्या यशाबद्दल जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, शेखर भंडारी, संजय मोडक, मिलिंद कचोळे, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड यांनी अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com