नाशिकच्या खेळाडूंचा बँकॉकमध्ये डंका; जम्प रोप स्पर्धेत मिळवली 'इतकी' पदकं

नाशिकच्या खेळाडूंचा बँकॉकमध्ये डंका; जम्प रोप स्पर्धेत मिळवली 'इतकी' पदकं

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

क्वीन्स कप थायलंड ओपन जम्प रोप चॅम्पियनशिप बँकॉक, थायलंड येथे नुकतीच पार पडली. मोठ्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भारताला प्रथमच 28 पदके मिळाली आहेत....

या स्पर्धेत 8 देशांनी 900 खेळाडूंसह सहभाग नोंदवला होता. भारतासह कोरिया, कझाकीस्तान, मलेशिया, हॉंगकॉंग, सिंगापूर, पाकिस्तान या देशांनी सहभाग घेतला. स्पर्धेत नाशिकमधून ६ खेळाडू सहभागी झाले होते. या सर्व खेळाडूंनी पदकांची कमाई केली आहे.

नाशिकच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी

सिंगल रोप ट्रिपल अंडर

१५ वर्षाखालील महिला : रोप्य

राजुला लुंकड

३० सेकंद स्पीड रिले

१५ वर्षांखालील महिला : रौप्य

1. मारवी हिरण

2. अंकिता महाजन

3. भार्गवी पाटील

4. राजुल लुंकड

३० सेकंद स्पीड रिले

१५ वर्षाखालील महिला: कांस्य

1. नियती छोरिया

2. भूमिका नेमाडे

3. श्रिया वाणी

4. तन्वी नेमाडे

३० सेकंद स्पीड रिले

15 वर्षाखालील पुरुष: कांस्य

1. ईशान पुथरान

2. रोहन देशमुख

3 .वीर कुल्हारे

4. नमन गंगवाल

या स्पर्धेत राजुल लुंकडला दोन रौप्य, मारवी हिरणला एक रौप्य, नियती छोरियाला एक कांस्य, नमन गंगवाल एक कांस्य, वीर कुल्हारे एक कांस्य, रोहन देशमुख एक कांस्यपदक पटकावले आहे. या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com