भारतामध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचे माझे स्वप्न - निता अंबानी
क्रीडा

भारतामध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचे माझे स्वप्न - निता अंबानी

निता अंबानींच्या नेतृत्वाखाली रिलायंस फाउडेशन अनेक शैक्षिणक आणि क्रीडा योजना चालवत आहेत

Ramsing Pardeshi

नवी दिल्ली - New Delhi

भारतामध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजीत करण्याचे माझे स्वप्न असून भारतातील अॅथलीटकांना जागतीक स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन करताना पाहू इच्छित असल्याचे मत फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट लिमिटेड (एफएसडीएल) तसेच रिलायंस फाउंडेशनच्या अध्यक्षा निता अंबानींनी व्यक्त केले.

नीता अंबानी ह्या आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (आयओसी) च्या सदस्य आहेत तसेच जमिनीस्तरावर खेळाडूंना तयार करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायंस फाउडेशन अनेक शैक्षिणक आणि क्रीडा योजना चालवत आहेत. याच्याशी लाखो मुले जोडले गेले आहेत.

रिलायंसच्या ४३ व्या व्हर्च्युअल सर्वसाधरण सभेत निता अंबानीनी पहिल्यांदाच रिलायंसच्या संचालक म्हणून बैठकीत बोलत होत्या. त्यांनी रिलायंस फाउंडेशनबाबत बोलतांना म्हटले की मागील दहा वर्षात फाउंडेशनने देशात तीन कोटी ६० लाख लोकांच्या जीवनात बदल आणला आहे.

त्यांनी म्हटले की कोरोना संकट काळात आम्ही मुंबईत भारतातील पहिला १०० बेड असलेला विशेष कोविड-१९ रुग्णालय स्थापित केले आणि तेही फक्त दोन आठवडयात. आमचे डॉक्टर आणि नर्स सहकारी भारतीयांची सेवेचा निस्वार्थ आणि अथक प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी महामारी पसरली तर सर्वांत मोठयां आव्हानापैकी एक होते पीपीई किटची कमी. आम्ही विक्रमी काळात प्रत्येक दिवशी एक लाखापेक्षा अधिक पीपीई आणि एन-९५ मास्कचे उत्पादन करण्यासाठी आपल्या विनिर्माण सुविधांमध्ये जरुरी बदल केले.

नीता अंबानीनी विश्वास दिला की ज्यावेळी कोरोनाची लस (व्हॅक्सीन) बनेल त्याला देशातील प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहचविण्याचे काम रिलायंस करेल.

शेअरधारकांना मिशन अन्न सेवची माहिती देतांना निता अंबानीनी म्हटले की मिशन अन्न सेवेच्या माध्यामातून आम्ही देशभरात हाशिएवर राहत असलेल्या समुदाय, दैनिक वेतनभोगी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला पाच कोटीपेक्षा अधिक भोजन प्रदान केले आहे. आम्हांला आनंद आहे की मिशन अन्न सेवा जगात कुठेही एका कॉरपोरेट फाउंडेशनद्वारा केला गेलेला सर्वांत मोठे भोजन वितरण कार्यक्रम बनला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com