Murali Vijay : मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

Murali Vijay : मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

दिल्ली | Delhi

भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयने (Murali Vijay) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

विजयने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये खेळला होता. त्याने 61 कसोटी, 17 एकदिवसीय आणि नऊ टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

विजयने 61 कसोटीत 3982 धावा, 17 एकदिवसीय सामन्यात 339 धावा आणि नऊ टी-20 सामन्यात 169 धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत 12 शतके झळकावली होती. मुरली क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये यशस्वी ठरला.

विजयची सर्वोच्च धावसंख्या 167 होती. त्याने कसोटीत 15 अर्धशतकेही केली आहेत. वनडे आणि टी-20मध्ये त्याला कसोटीसारखे यश मिळवता आले नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com