भारत -वेस्ट इंडीज दुसरा सामना आज; भारताची बॅटिंग

भारत -वेस्ट इंडीज दुसरा सामना आज; भारताची बॅटिंग

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणमच्या स्टेडियममध्ये थोड्याच वेळात सुरु होईल. या मॅचमध्ये वेस्ट इंडिज कर्णधार किरोन पोलार्ड याने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या मॅचसाठी टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे.

मागील मॅचमधून वनडेत पदार्पण करणाऱ्या शिवम दुबे याला बाहेर करण्यात आले असून वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर याला संधी देण्यात आली आहे. विंडीजच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहेत. सुनील अंब्रिसला वगळले आहे त्याच्या जागी एव्हिन लुईस आणि खारी पियरेच्या जागी हेडन वॉल्श जुनिअरला स्थान मिळाले आहेत.

यापूर्वी झालेल्या सामन्यात विंडीजने आठ विकेटने विजय मिळवला होता आणि मालिकेत ०-१ ने आघाडी घेतली. आता टीम इंडियासाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचे आहे. आजच्या सामन्यात पराभव म्हणजे मालिका पराभव. दुसरीकडे, विंडीज आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करतील.

भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज : एव्हिन लुईस, शाई होप, रोस्टन चेझ, अलज़ारी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वॉल्श जूनियर.

Related Stories

No stories found.