आज आयपीएलचा धडाकेबाज गुढीपाडवा; मुंबई-राजस्थान, गुजरात-दिल्ली हाय व्होल्टेज लढती

आज आयपीएलचा धडाकेबाज गुढीपाडवा; मुंबई-राजस्थान, गुजरात-दिल्ली हाय व्होल्टेज लढती
File Photo

मुंबई | Mumbai

आज आयपीएलमध्ये (IPL) दोन डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना मुंबईच्या डिवाय पाटील मैदानावर (D. Y. Patil Stadium Mumbai) दुपारी ३:३० वाजता खेळवण्यात येणार आहे. सलामी सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासमोर मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे हा पराभव मागे सारून नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी मुंबई सज्ज आहे...

पहिल्या सामन्यात अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे सामन्यात खेळू शकला नव्हता. मात्र तरीही मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १७७ अशी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले होते. मात्र गोलंदाजांनी केलेल्या सुमार गोलंदाजीमुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता.

मात्र राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला दिलासा मिळाला आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातून तो मुंबई संघातून पुन्हा एकदा खेळताना दिसेल. राजस्थान रॉयल्स संघाने सलामी हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २०० धावांचा पल्ला गाठला होता.

File Photo
Visual Story : ...म्हणूनच 'बच्चन पांडे' फ्लॉप; अक्षय कुमारची पहिली प्रतिक्रिया

यात जोस बटलर, संजू सॅमसन आणि देवदत्त पडिकल यांनी केलेल्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थानच्या विजयाचा पाया मजबूत केला होता. मात्र प्रसिद्ध कृष्णा, आर अश्विन, युझवेन्द्र चहल यांनी केलेल्या अचूक आणि भेदक गोलंदाजीमुळे राजस्थान संघाला ६१ धावांनी दणदणीत विजय मिळाला होता. आता मुंबईवर मात करून स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज आहे.

File Photo
Visual Story : काश्मिरी पंडितांचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे विचार कसे होते?

गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दुसरा सामना

दुसरा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी सलामी सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आपली लय कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.