IPL 2022, MI vs CSK : आज रंगणार ब्लॉकबस्टर सामना; लढतीपूर्वीच चेन्नईला मोठा धक्का

IPL 2022, MI vs CSK : आज रंगणार ब्लॉकबस्टर सामना; लढतीपूर्वीच चेन्नईला मोठा धक्का

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज दोन मातब्बर संघांमध्ये सामना रंगणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) एकमेकांसमोर असणार आहेत...

दोनही संघांना आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे. पराभूत संघाची वाट अधिक खडतर होणार आहे. यंदाच्या संपूर्ण हंगामात दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

मुंबईने (MI) आपल्या १४ पैकी ६ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे बाद फेरीत आपलं स्थान निश्चित करण्यासाठी मुंबईला आपले उर्वरीत ८ सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे. तर चेन्नई (CSK) संघाने आपल्या ६ सामन्यांमध्ये ५ पराभव आणि १ विजयासह २ गुण कमावले आहेत.

आजच्या सामन्यात विजय मिळवून दुसरा विजय संपादन करण्यासाठी चेन्नई सज्ज आहे. मागील ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास मुंबईचे पारडं जड राहिलं आहे. मूंबईने ३ तर चेन्न्नईने २ विजय मिळवले आहेत.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ईशान किशनचा (Ishan Kishan) खराब फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे तिलक वॉर्म, सूर्यकुमार यादव आणि डिवॉल्ड ब्रेवीस फॉर्मात आहेत. गोलंदाजीचा विचार केल्यास मुरुगन, अश्विन, बसील, थंपी, जयदेव उनाडकट लयीत नाहीत. टायमल मिल्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.

त्याच्याजागी धवल कुलकर्णीला संधी मिळू शकते. चेन्नई (Chennai) संघासाठी दिलासादायक गोष्ट म्हणजे सलामीवीर ऋतुराज गायकवाड फॉर्मात परतला आहे. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरविरुद्ध (RCB) विजयाचा शिल्पकार ठरलेला रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे सपशेल अपयशी ठरले होते.

तसेच अंबाती रायडू, मोईन अली, धोनी, जडेजा यांना अधिक जबाबदारीने खेळावे लागणार आहे. गोलंदाजीतही चेन्नई संघात अनुभवाची कमतरता मागील ६ सामन्यांमध्ये प्रकर्षाने जाणवली आहे.

क्रिस जॉर्डन, मुकेश चौधरी महागडे ठरले आहेत. तर ब्रावो, महेश तीक्षणा यांनी आपल्या गोलंदाजीतून चमकदार कामगिरी केली आहे. चेन्नई (Chennai) आणि मुंबई (Mumbai) आतापर्यंत एकूण ३४ वेळा एकमेकांशी भिडले आहेत. यात मुंबईने २० तर चेन्नईने १३ सामन्यात विजय नोंदवला आहे.

लढतीपूर्वीच चेन्नईला मोठा धक्का

चेन्नईचा (CSk) डेवीन कॉन्वे (Devon Conway) आज मुंबईविरुद्ध (MI) होणारा सामना खेळणार नाही. त्याच्या विवाहासाठी तो थेट दक्षिण आफ्रिकेला (South Africa) पोहोचला आहे. १८ एप्रिल रोजी त्याच्या सहकारी खेळाडूसोबत प्री- वेडिंग पार्टीनंतर त्याने सीएसकेच्या बायो -बबलमधून माघार घेतली आहे.

विवाहानंतर २३ एप्रिल रोजी तो भारतात दखल होईल. आणि २५ एप्रिल रोजी पंजाबविरुद्धच्या लढतीसाठी तो सिलेक्शनचा भाग असणार आहे. न्यूझीलंडचा डेवीन कॉन्वे दक्षिण आफ्रिकेतील त्याची गर्लफ्रेंड किमसोबत तो विवाहगाठ बांधणार आहे. सीएसकेचं बबल सोडण्यापूर्वी सीएसकेच्या सहकाऱ्यांनी त्याला एक प्री वेडिंग पार्टी दिली. सोमवारी झालेल्या पार्टीत सीएसकेचे सर्व खेळाडू दक्षिण भारतीय पोषाखात दिसले.

चेन्नई संघाने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून ते शेअर केले आहेत. या पार्टीत डेवीन कॉन्वेने पांढरा चमकदार शर्ट आणि लुंगीसार गमछा परिधान केला होता. संघातील सर्व खेळाडूंनी त्याच्यासोबत छायाचित्रे काढली.

एम एस धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली आणि मिचेल सॅन्टेनर यांनी कुर्त्यात छायाचित्रे काढली. यामध्ये मोईन अलीने लाल तर ऋतुराज गायकवाड आणि धोनी पिवळ्या तर मिचेल सॅन्टेनर निळ्या कुर्त्यात दिसत होते.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.