MI vs RCB : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात आज मुकाबला

MI vs RCB : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात आज मुकाबला

दुबई | Dubai

आयपीएल २०२१ मध्ये (IPL 2021) आज रविवारी दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात दुबई येथे होणार आहे...

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत दुसऱ्या हाफमध्ये मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

पहिल्या हाफमध्ये ७ सामन्यांमध्ये ४ विजय आणि ३ पराभवांसह चौथे स्थान मिळवणाऱ्या मुंबई संघाला (MI) दुसऱ्या हाफमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाविरुद्ध सलग २ पराभव पत्करावा लागल्यामुळे मुंबई संघाची सातव्या स्थानी घसरण झाली आहे.

आता आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत झाल्यास बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मुंबईला आपले चारही सामने जिंकावे लागणार आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संघात दणक्यात पुनरागमन करताना एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.

आयपीएल स्पर्धेत केकेआरविरुद्ध १००० धावा करणारा फलंदाज तो ठरला होता. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक यांनी कोलकाताविरुद्ध संघाला ९ षटकात बिनबाद ७८ अशी सुरुवात करून दिली होती. त्या क्षणाला मुंबई कोलकाताविरुद्ध २०० धावांचा टप्पा पार करणार असे दिसत होते.

सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यावर क्विंटन डिकॉकने शानदार अर्धशतक झळकावले होते. मात्र सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि कायरान पोलार्ड झटपट बाद झाल्यामुळे मुंबईला २० षटकात १५५ धावा काढता आल्या होत्या.

कोलकाता संघाने हे लक्ष १५. १ षटकात सहज पार केले गोलंदाजीत जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह वगळता मुंबईचे इतर गोलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. त्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी बिन बाद १०० धावा अशी आकर्षक सुरुवात करून देखील ग्लेन मॅक्सवेल, अब्राहाम डिव्हिलिअर्स हे हुकमी एक्के झटपट बाद झाल्यामुळे केवळ १५७ धावाच उभारता आल्या होत्या. या धावसंख्येचा हर्षल पटेल वगळता बंगळूर संघाच्या इतर गोलंदाजांनी साफ निराशा केली होती.

मुंबई संघाप्रमाणे बंगळूर संघाचा बाद फेरीत दाखल होण्याचा काहीसा अवघड दिसत आहे. त्यांना आपल्या उर्वरीत ५ सामन्यांमध्ये किमान ३ विजय आवश्यक आहेत.

बंगळूर संघाला (RCB) मागील दोन्ही पराभव विसरून नव्याने मुंबईविरुद्ध बाजी मारण्यासाठी अब्राहाम डिव्हिलिअर्स आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडून वादळी खेळी अपेक्षित आहे. शिवाय ईशान किशन, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, रोहित शर्मा आणि यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

मात्र हे सर्व खेळाडू यंदाच्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात कमालीचे अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच त्यांची सुमार कामगिरी कफ्तान कोहली आणि सर्व चाहत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्याला विश्रांती देण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे दिसून आले आहे.

आयपीएल २०२० मध्ये दुबईमध्ये झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये बंगळूर संघाने मुंबईवर थरारक विजय नोंदवला होता. आयपीएल २०२१ च्या सलामी सामन्यात बंगळूरने अखेरच्या षटकात २ गडी राखून मुंबईवर मात केली होती. या पराभवाची परतफेड करण्यासाठी मुंबईने कंबर कसली आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.