तीन वर्षांनंतर धोनीने केला ‘त्या’ घटनेचा खुलासा; म्हणाला...

तीन वर्षांनंतर धोनीने केला ‘त्या’ घटनेचा खुलासा; म्हणाला...

मुंबई | Mumbai

जगातील एक यशस्वी कर्णधार म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस. धोनीला ओळखले जाते. गांगुली, द्रविडनंतर संघ बांधणीचे कसब हे धोनीकडे चांगल्या प्रकारे होते. एका व्यावसायिक कार्यक्रमावेळी बोलताना धोनीने आपल्या निवृत्तीचे गुढ उकलले.

महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० ला एका ओळीच्या ट्विटने आपली देदिप्यमान कारकीर्द संपलवी होती. मात्र नुकत्याच केलेल्या वक्तव्यानुसार धोनीने या दिवशी निवृत्तीचा निर्णय घेतला नव्हता. पण, ५ ऑगस्टला धोनीने केवळ औपचारिक घोषणा केली, त्यापूर्वीच धोनीने आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला होता. एका कार्यक्रमात स्वतः धोनीने यासंदर्भात माहिती दिली असून सध्या धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तीन वर्षांनंतर धोनीने केला ‘त्या’ घटनेचा खुलासा; म्हणाला...
भारतीय नौदलाचे ते ८ अधिकारी कोण? कतारने फाशीची शिक्षा का सुनावली? त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले?

धोनीने आपल्या निवृत्तीबाबत प्रत्येक गोष्टीचा उलगडा केला. तो म्हणाला, 'ज्यावेळी तुम्ही खूप थोड्या अंतराने हरता त्यावेळी भावनांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते. माझ्यासाठी तो भावनिक क्षण हा ज्यावेळी मी भारतासाठी शेवटचा सामना खेळला त्यावेळीचा होता. मी जवळपास एका वर्षानंतर निवृत्ती जाहीर केली मात्र खरे सांगू का मी त्याच दिवशी निवृत्त झालो होतो.'

पुढे धोनी म्हणाला, 'आम्हा क्रिकेटपटूंना एक विशिष्ट मशिन देण्यात आली होती. मी ज्यावेळी ते मशिन देण्यासाठी ट्रेनरकडे जायचो त्यावेळी तो मला ते पर देत तू हे ठेव असं म्हणायचा. माझ्या मनात विचार यायचा की मी याला कसं सांगू की आता मला याची काही गरज राहिलेली नाही.'

क्रिकेट रसिकांना २०१९ च्या विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेला सेमी फायनलचा सामना आठवत जरी नसला तरी धोनीचे त्या सामन्यात धावबाद होणे सगळ्यांनाच आठवत असले. कारण, २०१९ च्या विश्वचषकाच्या सामन्यात धोनी मोक्याच्या क्षणी धावबाद झाला आणि भारतीयांच्या स्वप्नांवर पाणी फेरले होते. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील हा सेमीफायनलचा सामना होता. धोनी रनआऊट झाल्यानं कोट्यवधी भारतीय हिरमूसले होते. धोनी स्वतःही हमसून हमसून रडला होता.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com