मोहम्मद सिराज सुसाट! भल्या भल्यांना चीतपट करत ICC क्रमवारीत ठरला अव्वल

मोहम्मद सिराज सुसाट! भल्या भल्यांना चीतपट करत ICC क्रमवारीत ठरला अव्वल

मुंबई | Mumbai

भारताचे सर्वच खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. टीम इंडिया वनडे रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आली तर आता वनडे मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची यादीदेखील समोर आली आहे.

या यादीमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या (Mohammed Siraj) आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. या रँकिंगमध्ये सिराजच्या सगळ्या गोलंदाजांना मागे टाकत पहिला क्रमांक गाठला आहे. गेल्या वर्षभरात एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराज याने गोलंदाजीत दर्जेदार कामगिरी केली.

मोहम्मद सिराजने १५ जानेवारी २०१९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड येथील सामन्यात वन डे पदार्पण केले होते. या सामन्यात सिराजला एकही बळी मिळाला नव्हता. तसेच पुढील तीन वर्षे एकही वन डे सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. सिराजने ६ फेब्रुवारी २०२२ रोजी तीन वर्षांनंतर कारकिर्दीतील दुसरा वन डे सामना खेळला होता.

यानंतर सिराजने चमकदार खेळी केली आणि भल्या भल्यांना मागे टाकले. सिराजने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण २१ वन डे सामने खेळले असून त्यात त्याने २०.७३ च्या सरासरीने ३८ बळी घेतले आहेत. अलीकडेच सिराजने न्यूझीलंडविरुद्ध तीनपैकी दोन वन डे सामने खेळले, ज्यात त्याने ५ बळी घेतले. याआधी श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांमध्ये सिराजने ९ बळी पटकावले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com