ICC T20 World Cup : बुमराहच्या जागी 'या' खेळाडूचा भारतीय संघात समावेश

ICC T20 World Cup : बुमराहच्या जागी 'या' खेळाडूचा भारतीय संघात समावेश

मुंबई | Mumbai

आयसीसी टी २० वर्ल्डकप (ICC T20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) जसप्रीत बुमराहच्या जागी बदली खेळाडू म्हणून जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची भारतीय संघात निवड केली आहे....

जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे वर्ल्डकप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे भारताला (India) मोठा धक्का बसला होता. पंरतु आता त्याच्याजागी मोहम्मद शमीची (Mohammed Shami) निवड झाल्याने भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.

तर मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खेळू शकला नव्हता. पंरतु करोनावर (Corona) यशस्वी मात करून त्याने सराव करण्यास सुरुवात केली. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट पास केली होती. त्यानंतर आता तो ऑस्ट्रेलियाला (Australia) रवाना झाला आहे.

दरम्यान, मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांना राखीव खेळाडू म्हणून संघात संधी देण्यात आली आहे.

सलील परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com