'पेटीएम'ला सुट्टी! आता 'मास्टरकार्ड' बीसीसीआयचे मुख्य प्रायोजक

'पेटीएम'ला सुट्टी! आता 'मास्टरकार्ड' बीसीसीआयचे मुख्य प्रायोजक

मुंबई | Mumbai

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी मुख्य प्रायोजक म्हणून पेटीएमची (Paytm) जागा मास्टरकार्ड (Mastercard) घेणार आहे. बीसीसीआयने नुकतीच याबाबत घोषणा केली आहे...

ही घोषणा बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत संकेतस्थळावर केली आहे. पेटीएम २०१५ पासून मुख्य प्रायोजक होते. २०१९ मध्ये नव्याने करारही करण्यात आला होता. मात्र काही काळापूर्वी पेटीएमने या करारातून मुक्त होण्याची विनंती केली होती.

'पेटीएम'ला सुट्टी! आता 'मास्टरकार्ड' बीसीसीआयचे मुख्य प्रायोजक
एका झटक्यात सारं काही हिरावून नेलं, ४० हून अधिक दगावले; 'पाहा' चीनमध्ये काय झाले?

बीसीसीआयने याला मान्यता दिली असून, आता मास्टरकार्ड सोबत २०२२-२३ साठी वर्षभराचा करार केला आहे. मुख्य प्रायोजकत्व मिळण्यासाठी २०१५ मध्ये पेटीएमने एकूण ४ वर्षांसाठी करार केला होता. २.४ कोटी प्रति सामना करार केला होता.

'पेटीएम'ला सुट्टी! आता 'मास्टरकार्ड' बीसीसीआयचे मुख्य प्रायोजक
'तो' पुन्हा येणार! 'या' भागात कोसळणार मुसळधार पाऊस

पेटीएमने २०२३ चे प्रायोजकत्व मिळण्यासाठी एकूण प्रति सामना ३. ८० कोटी रुपयांची बोली लावली होती. आता मास्टरकार्डने पेटीएमची जागा घेतलेली असली तरीही करारातील रकमेत कोणताही बदल होणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com