मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी 'या' दिग्गजाची निवड

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी 'या' दिग्गजाची निवड

मुंबई | Mumbai

आयपीएल (IPL) स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएल १६ साठी नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२१ आणि २०२२ हा हंगाम वाईट ठरला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएलच्या १६ व्या हंगामात नव्याने मैदानात उतरणार असून यासाठी मुख्य प्रशिक्षकाची (Head coach) घोषणा करण्यात आली आहे...

मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची (Mark Boucher) निवड करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मार्क बाऊचर श्रीलंकेचे माजी फलंदाज महेला जयवर्धनेची (Mahela Jayawardene) जागा घेणार आहे. मुंबई इंडियन्सने जयवर्धने यांची जागतिक कामगिरी प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे.

तसेच मुंबई इंडियन्सचे मालक (Mumbai Indians owner) आकाश अंबानी (Akash Ambani) यांनी मार्क बाऊचर यांची संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय बाऊचर आपल्या विविध कौशल्यांचा वापर करून संघाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतील. संघाचा वारसा पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील असे अंबानी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आयपीएल स्पर्धेमध्ये मार्क बाऊचर यांनी अनेक सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून (Royal Challengers Bangalore) खेळले आहेत. तसेच २०१९ साली दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिकपदाची सर्व सूत्र आपल्याकडे घेतल्यांनंतर त्यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत संघाने १० कसोटी सामन्यांममध्ये विजय मिळवला. याशिवाय त्यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत मर्यादित षटकांच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने १२ वनडे आणि २३ टी २० सामन्यांमध्ये विजय संपादन केला आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com