‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रासह 'या' १२ खेळाडूंचा होणार खेलरत्नने सन्मान

35 जणांना अर्जुन पुरस्कार
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रासह 'या' १२ खेळाडूंचा होणार खेलरत्नने सन्मान

दिल्ली | Delhi

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने (Sports Ministry) मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2021 ची घोषणा केली आहे. 13 नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) मध्ये भालाफेक (Javelin throw) या खेळात भारताला सुवर्ण पदक (Gold medal) मिळवून देणारा गोल्डन बॉय नीरज चोप्राला खेलरत्न पुरस्कार (Khel Ratna Award) देण्यात येणार आहे. नीरज चोप्रासह अजून 12 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyanchand Khel Ratna Award) जाहीर झाला आहे.

या 12 जणांमध्ये रवी दहिया, पीआर श्रीजेश आणि लवलीना बोरगोहोई, भारताची अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) आणि फूटबॉलपटू सुनील चेत्री, सुमित अंतिल,अवनी लेखरा आदींचा समावेश आहे.

2021 हे वर्ष भारतीय खेळाडूंसाठी खास होतं. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताने मागील स्पर्धेच्या तुलनेत यंदा अधिक पदके भारताने जिंकली आहेत. ऑलिम्पिकसह पॅरालिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली.

पॅरालिम्पिकमध्ये पहिल्यांदाच दोन पदकं जिंकणाऱ्या अवनी लेखराचाही खेल रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय पॅरालिम्पिकमध्ये एफ64 मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या सुमित अंतिल याचाही खेल रत्न देऊन गौरव करण्यात येईल.

शिखऱ धवन, संदीप नरवाल आणि भवानीदेवी यांच्यासह 35 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 10 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मानाचे नामकरण महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावावर केले होते. चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्टार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो.

पुरस्कार विजेत्या खेळाडूंची नावं –

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

नीरज चोप्रा (एथलेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लवलीना बोरगोहेन (बॉक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनी लेखारा (पॅरा शूटिंग), सुमित अंतिल (पॅरा अथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), कृष्णा नागर (पॅरा बॅडमिंटन), मनीष नरवाल (पॅरा शूटिंग), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंह (हॉकी).

अर्जुन पुरस्कार:

अरपिंदर सिंह (अथलेटिक्स), सिमरनजीत कौर (बॉक्सिंग), शिखर धवन (क्रिकेट), सीए भवानी देवी (तलवारबाजी), मोनिका (हॉकी), वंदना कटारिया (हॉकी), संदीप नरवाल (कबड्डी), हिमानी उत्तम परब (मल्लखंब), अभिषेक वर्मा (शूटिंग), अंकिता रैना (टेनिस), दीपक पूनिया (कुस्ती), दिलप्रीत सिंह (हॉकी), हरमनप्रीत सिंह (हॉकी), रूपिंदर पाल सिंह (हॉकी), सुरेंद्र कुमार (हॉकी), अमित रोहिदास (हॉकी)), बीरेंद्र लाकड़ा (हॉकी), सुमित (हॉकी), नीलकांत शर्मा (हॉकी), हार्दिक सिंह (हॉकी), विवेक सागर प्रसाद (हॉकी), गुरजंत सिंह (हॉकी), मनदीप सिंह (हॉकी), शमशेर सिंह (हॉकी), ललित कुमार उपाध्याय (हॉकी), वरुण कुमार (हॉकी), सिमरनजीत सिंह (हॉकी), योगेश कथूनिया (पॅरा अथलेटिक्स), निषाद कुमार (पॅरा अथलेटिक्स), प्रवीण कुमार (पॅरा अथलेटिक्स), सुहाश यतिराज (पॅरा बॅडमिंटन), सिंहराज अधाना (पॅरा शूटिंग), भावना पटेल (पॅरा टेबल टेनिस), हरविंदर सिंह (पॅरा तीरंदाजी) आणि शरद कुमार (पॅरा अथलेटिक्स).

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com