धोनी...धोनी...! आयपीएलमध्ये घुमणार आवाज; यंदाचा हंगाम शेवटचा?

धोनी...धोनी...! आयपीएलमध्ये घुमणार आवाज; यंदाचा हंगाम शेवटचा?

नाशिक | Nashik

जगातील सर्वात श्रीमंत लीग आयपीएल (IPL) स्पर्धेच्या सोळव्या सीझनची तयारी पूर्ण झाली आहे. ३१ मार्च २०२३ ते २८ मे २०२३ पर्यंत आयपीएलचा हंगाम खेळवण्यात येणार असून, यंदाचा आयपीएल हंगाम महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni) अखेरचा हंगाम ठरण्याची शक्यता आहे.

यादरम्यान धोनी आपला आयपीएलमधील शेवटचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाच्या एम. ए. चिदंबरम क्रिकेट मैदानावर (M. A. Chidambaram Cricket Ground) खेळणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. १४ मे रोजी धोनी आयपीएलमधील आपला अखेरचा सामना खेळणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

हा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघांमध्ये खेळवला जाईल. धोनीच्या अखेरच्या सामन्याला चेन्नई सुपरकिंग्ज फ्रँचायझी कडून अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. धोनी तब्बल १४२७ दिवसांनी चेन्नईच्या मैदानावर खेळणार असल्याने, क्रिकेटप्रेमींना (Cricket) त्याचा खेळ मोठ्या अंतराने अनुभवायला मिळणार आहे.

धोनी...धोनी...! आयपीएलमध्ये घुमणार आवाज; यंदाचा हंगाम शेवटचा?
शिवसेना नाव आणि चिन्ह चोरीला गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

आतापर्यंत धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने सर्वाधिक ४ विजेतेपद पटकावली आहेत. धोनी कर्णधार म्हणून १०० सामने जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. यापार्श्वभूमीवर हा सामना अधिक रंजक ठरण्याची शक्यता आहे.

धोनी...धोनी...! आयपीएलमध्ये घुमणार आवाज; यंदाचा हंगाम शेवटचा?
Womens T20 WC : भारतासाठी आज 'करो या मरो'चा सामना
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com