
नाशिक । प्रतिनिधी Nashik
पुणे (Pune )येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलंपिक स्पर्धेत ( Maharashtra State Olympic Tournament)टेबल टेनिस महिला एकेरीत नाशिकच्या सायली वाणी हिने नाशिकच्याच तनिशा कोटेचा अंतिम फेरीत 4-2 असा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले.
अंतिम फेरीच्या सामन्यात सायलीने पहीला गेम 12-20 जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली परंतु पुढचे दोन गेम तानिशाने 10-12 व 4-11 जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली. परंतु सायलीने आपले कसब पूर्ण पणाला लावून पुढील तीन गेम 11-3, 11-7 व 11-8 असे जिंकून 4-2 असा विजय मिळवत टेनिस महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. या गटाचे सुवर्ण व रजत पदक असे दोन्ही पदके नाशिकने मिळविले. दुसर्या उपांत्य फेरीच्या नासिकच्याच सायली वाणी हीने उपांत्य फेरीत पुण्याच्या पृथा वर्टिकर हीचा 4-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सायलीने पहिला गेम 4-11 असा गमावला परंतु त्यानंतर आपल्या अनुभवाचा वापर करून 11-6, 11-3, 11-8 व 11-9 असे सरळ पुढील चार गेम जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
सांघिक गटात नासिकच्या पुरुष व महिला या दोन्ही संघानी कांस्य पदक पटकावले. पुरुष संघात कुशल चोपडा, नुतांशु दायमा, पुनीत देसाई, अजिंक्य शिंत्रे, सुजित कळसेकर तर महिला संघात सायली वाणी, तनिशा कोटेचा, मिताली पुरकर, जान्हवी कळसेकर, अनन्या फडके यांचा समावेश होता.
22 वर्षानंतर झालेल्या पहिल्याच महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेतील महिला एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेत दोन्ही खेळाडू नाशिकचे असल्याने आनंद व्यक्त करतांना नासिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी याचे श्रेय या दोन्ही खेळाडूंना दिले. त्यांना प्रशिक्षक जय मोडक यांचे मार्गदर्शन लाभले. दोघींच्या विजयाबद्दल संघटनेचे उपाध्यक्ष शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, सचिव राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, जय मोडक, संजय वसंत, सतीश पटेल यांनी अभिनंदन केले.