
नाशिक । प्रतिनिधी Nashik
हिमाचल प्रदेशात उना येथे सुरु असलेल्या 22 व्या ऑल इंडिया पोलीस रोईंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलीस संघाने रोईंग कॉकलेस फोर 2000 मीटर मध्ये चार सुवर्ण पदक प्राप्त केले.
या स्पर्धेत आयटीबीपी,बीएसएफ,सीआरबीएफ,एसएसबी,आसाम रायफल आदी 19 संघांनी सहभाग नोंदवला.संतोष कडाळे,अनिकेत हळदे,ज्ञानेश्वर सुरसे ,सूर्यभान घोलप यांनी ही कामगिरी केली.संघ व्यवस्थापक अभिजीत मोरे,प्रशिक्षक समाधान गवळी हे आहेत.