IPL 2022 : लखनौ-बंगळूरचा आज सामना; कोण गाठणार अव्वल स्थान?

IPL 2022 : लखनौ-बंगळूरचा आज सामना; कोण गाठणार अव्वल स्थान?

मुंबई | Mumbai

यंदाच्या आयपीएल (IPL) पदार्पणाच्या सत्रात दमदार सुरुवात करणारा लखनौ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघ विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) संघाचा सामना आज सायंकाळी ७:३० वाजता नवी मुंबईच्या डीवाय पाटील क्रिकेट मैदानावर रंगणार आहे....

आजच्या सामन्यात विजय मिळवून आयपीएल (IPL) गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्यासाठी लखनौ (LSG) आणि बंगळूर (RCB) आज भिडणार आहेत.

आयपीएलमध्ये (IPL) प्रथमच दोन्ही संघांमध्ये सामना होणार आहे. लोकेश राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात खेळणारा लखनौ ६ सामन्यांमध्ये ४ विजय आणि २ पराभवांसह ८ गुणांनीं दुसऱ्या तर बंगळूर संघही ६ सामन्यांमध्ये ४ विजय आणि २ पराभवांसह ८ गुणांनी चौथ्या स्थानावर आहे.

गत लढतीमध्ये बंगळूर संघाने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला पराभूत केले आहे. या विजयामुळे आजच्या सामन्यात बंगळूर संघाला विजयाची मोठी संधी आहे.

नवीन कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या (faf du plessis) नेतृत्वात बंगळूर संघाने यंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मात्र मागील काही सामन्यांमध्ये संघाला सुमार फलंदाजीचा सामना करावा लागला आहे.

त्यामुळे इतर सर्व फलंदाजांना आपल्या फलंदाजीचा दर्जा उंचावण्याची गरज आहे. संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे दिनेश कार्तिक (Dinesh Kartik), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ऊत्तम फलंदाजी करत आहेत.

मात्र संघासाठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार फाफ डू प्लेसिसची आणि माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट अद्याप मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरली आहे.

मात्र संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास श्रीलंकेचा अष्टपैलू वनिंदूं हसरंगा, मोहंमद सिराज आणि आकाश दीपने आपल्या गोलंदाजीतून मागील काही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

सलामीवीरांवर विजयाची भिस्त याशिवाय उत्तम गोलंदाजीच्या बळावर लोकेश राहुलच्या लखनौ संघाने चमकदार कामगिरी केली आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) झालेल्या मागील सामन्यात कर्णधार लोकेश राहुलने शानदार शतकी खेळी साकारली होती. मनीष पांडेला (Manish Pandey) अद्याप फलंदाजीत अद्याप सूर गवसलेला नाही. मात्र प्रमुख गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan) आपल्या गोलंदाजीतून सर्वच आयपीएल (IPL) चाहत्यांना प्रभावित केले आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com