
मुंबई | Mumbai
भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा नियमित कर्णधार रिषभ पंतच्या (Rishabh Pant) गाडीला काल शुक्रवारी पहाटे अपघात (Accident) झाला...
या अपघातात रिषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्टेबल असून, त्याच्यावर देहरादून येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वैद्यकीय टीम रिषभ पंतवर लक्ष ठेऊन आहेत. आयपीएल २०२३ चा हंगाम सुरु होण्यास ३ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, रिषभ दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे.
त्याचं आयपीएल हंगामात त्याचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात दिल्लीचं नेतृत्व नवीन कर्णधाराच्या खांद्यावर सोपवलं जाण्याची शक्यता आहे. रिषभच्या अनुपस्थितीत संघाचं कर्णधारपद मजबूत खेळाडूकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. यासाठी संघात डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे.
डेविड वॉर्नरने इंटरनॅशनल सामने तसेच आयपीएलमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉ तरुण असून, प्रतिभावान खेळाडू आहे डेविड वॉर्नर आयपीएल २०१४-२०२१ या काळात सनराईझर्स हैद्राबादकडून खेळला आहे. त्यानंतर २०२२ हंगामात आयपीएलच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने वॉर्नरवर सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले होते.
२०१६ हंगामात हैद्राबाद संघाने वॉर्नरच्या नेतृत्वात आयपीएल किताबही पटकावला आहे. तसेच युवा फलंदाज पृथ्वी शॉ अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे. देशांतर्गत क्रिकेट सामन्यात पृथ्वी मुंबई संघाचं नेतृत्व करतो. त्यामुळे वॉर्नर किंवा पृथ्वीवर संघाचं कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं लवकरच नवीन कर्णधाराची घोषणा दिल्ली कॅपिटल्स करू शकते.
सलिल परांजपे, नाशिक.