एमएस धोनी
एमएस धोनी|303404198066101
क्रीडा

कॅप्टन कुल धोनी बनला शेतकरी

शेतात ट्रॅक्टरने नांगरणी

Gokul Pawar

मुंबई : करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट स्पर्धा ठप्प झाल्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आपल्या कुटुंबासोबत रांची येथील फार्महाऊसवर शेतीची नांगरणी करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एम एस धोनीचा हा व्हायरल व्हिडीओ एका फॅनने शेअर केला असून यात धोनी ट्रॅक्टरवर शेत नांगरताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जगभरात करोना व्हायरसच्या प्रसारामुळे इंडियन प्रीमिअर लीग अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यावर पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा सोबत धोनी रांची येथील आपल्या फार्महाऊसवर पोहचला आणि लॉकडाऊन पासून तो तेथे स्थायिक आहे.

या दरम्यान, धोनीच्या पत्नी साक्षीने भारतीय कर्णधाराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com