युटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या कुशलला कांस्य

युटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या कुशलला कांस्य

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पुडुचेरी (pondicherry) येथे झालेल्या यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत (utt national ranking table tennis championships) नाशिकच्या कुशल चोपडाने (Kushal Chopra) 15 वर्षाखालील मुलांच्या गटात कांस्यपदक (Bronze medal) पटकावले...

उपांत्यपूर्व फेरीत त्याने महाराष्ट्राच्या आशय यादव (Ashay Yadav) याचा 11-7, 11-9, 11-5 असा 3-0 असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत त्याची गाठ भारताचा प्रथम मानांकित तमिळनाडूच्या बालामुरगन मुथु (Balamuragan Muthu) याच्याशी पडली.

उपांत्य फेरीत त्याच्या बरोबर झालेल्या सामन्यात कुशलने चांगली झुंज दिली. परंतु 9-11,9-11, 9-11, 11-7, 11-7 व 8-11 असा 4-2 ने पराभवास सामोरे जावे लागले. पहिले तीन गेम गमावल्यानंतर कुशलने पुढचे दोन गेम घेऊन खेळात रंगत आणली.

सहाव्या गेममध्ये शेवटपर्यंत झुंज देणार्‍या कुशलला बालामुरगन मुथु याने 11-8 असा पराभव करून सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. कुशल हा राष्ट्रीय स्तरावर या गटात तिसरा मानांकित आहे.

टेबल टेनिस कोच जय मोडक (Jay Modak) यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करीत आहे.
त्याच्या या यशाबद्दल जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, संजय मोडक, अभिषेक छाजेड, जय मोडक, संजय कडू, योगेश देसाई यांनी अभिनदंन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com