मोठी बातमी! कृणाल पांड्याला करोनाची लागण, आजचा टी-२० सामना पुढे ढकलला

दुसरा टी-२० सामना पुढे ढकलला
मोठी बातमी! कृणाल पांड्याला करोनाची लागण, आजचा टी-२० सामना पुढे ढकलला

दिल्ली | Delhi

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघालाही (Sri Lanka vs India) करोनाचा (Corona) फटका बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला करोनाची लागण झालेली आहे (Krunal Pandya tested positive for COVID).

यानंतर आज होणारा दुसरा टी-२० (second T20) सामना पुढे ढकलण्यात आला आहे. सामना सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना ही बाब समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

बायो बबलमध्ये (Bio-bubble) करोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोन्ही संघांना आयसोलेट केले असून आजचा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या, तर हा सामना उद्या बुधवारी म्हणजेच २८ जुलैला खेळला जाईल, असे सुत्रांनी सांगितले आहे.

भारतीय संघातील (Team India) ८ सदस्य हे कृणालच्या थेट संपर्कात आल्यामुळे त्यांच्या तब्येतीचीही विशेष काळजी घेतली जात आहे. परंतू कृणालला नेमक्या कोणत्या कारणामुळे करोनाची लागण झाली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. परंतू कृणालला करोनाची लागण झाल्यामुळे पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव (Prithvi Shaw and Suryakumar Yadav) यांचा इंग्लंड दौरा (England tour) लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com