पंड्या कुटुंबियांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

पंड्या कुटुंबियांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

मुंबई । Mumbai

भारतीय संघाचा ऑलराउंडर खेळाडू क्रुणाल पंड्याने (Krunal Pandya) आणि पंखुडी शर्मा (Pankhurii Sharma) यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. क्रुणाल पहिल्यांदाच बाबा (Baby boy) झाला असून त्याने ही गोड बातमी सोशल मीडियावरून दिली आहे. याशिवाय क्रुणालने आपल्या चिमुकल्या पाहुण्याचे नाव देखील जाहीर केले आहे...

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये (IPL) शानदार प्रदर्शन केल्यानंतर देखील क्रुणाल संघाबाहेर आहे. मात्र आता त्याने दिलेल्या या बातमीने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने बाळाचे दोन फोटो शेअर केले असून ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तर भारतीय संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) काका बनला आहे.

क्रुणाल पंड्याने पत्नी पंखुडी शर्मा सोबत इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले असून या फोटोत दोघेही बाळाला हातावर घेऊन आहेत. ज्यामध्ये त्यांचे बाळ देखील पाहायला मिळत आहे. क्रुणालने फोटो शेअर करत 'कवीर क्रुणाल पंड्या' असे कॅप्शन लिहून बाळाचे नाव जाहीर केले आहे. क्रुणालने खास इमोजी शेअर करून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान,क्रुणाल पंड्या आणि मॉडेल पंखुडी शर्मा हे २७ डिसेंबर २०१७ रोजी विवाहबंधनात (Marriage) अडकले होते. लग्न झाल्यानंतर जवळपास पाच वर्षांच्या कालावधीनंतर ते आई-बाबा झाले आहेत. क्रुणालने २०१८ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने १९ टी-२० आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच क्रुणाल पंड्या बाबा झाल्यानंतर आता क्रिकेट विश्वातून त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com