IPL 2022, KKR vs RR : बाद फेरीच्या शर्यतीत कोलकाता टिकणार का?

IPL 2022, KKR vs RR : बाद फेरीच्या शर्यतीत कोलकाता टिकणार का?

मुंबई | Mumbai

आयपीएलच्या (IPL) उदघाटन पर्वाचे विजेते राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २ वेळच्या आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाशी भिडणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता खेळवण्यात येणार आहे...

आयपीएल २०२२ च्या (IPL 2022) सुरुवातीच्या ४ सामन्यांमध्ये ३ विजय आणि १ पराभव अशी दणक्यात सुरुवात केल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला सलग ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

IPL 2022, KKR vs RR : बाद फेरीच्या शर्यतीत कोलकाता टिकणार का?
Visual Story : राज ठाकरेंना दुबईवरून धमकीचा फोन आला अन्...

कोलकाता संघाच्या खात्यात ९ सामन्यांमध्ये ३ विजय आणि ६ पराभवांसह ६ गुण आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवून सलग ५ सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडित करण्याचा केकेआरचा (KKR) आज मानस असणार आहे.

तर दुसरीकडे कोलकातावर मात करून स्पर्धेतील आपला सातवा सामना जिंकण्यासाठी आणि अव्वल २ संघांमध्ये धडक मारण्यासाठी राजस्थान आज मैदानात उतरणार आहे.

IPL 2022, KKR vs RR : बाद फेरीच्या शर्यतीत कोलकाता टिकणार का?
Visual Story : ...म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

राजस्थान रॉयल्स (RR) संघ यंदाच्या आयपीएलमध्ये बलाढ्य संघांपैकी एक मानला जात आहे. मात्र यंदाच्या आयपीएल (IPL) हंगामात प्रचंड लयीत असलेल्या राजस्थान रॉयल्स (RR) संघाला मागील सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) पराभूत करून त्यांचा विजयीरथ रोखण्यात मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) यश आले होते. आजच्या सामन्यात जोस बटलर, संजू सॅमसन, आर अश्विन, श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल हे स्टार प्लेअर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.