
मुंबई | Mumbai
आयपीएलमध्ये (IPL) आज केकेआर (KKR) आणि पंजाबकिंग्ज (PBKS) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) सायंकाळी ७:३० वाजता सामना होणार आहे...
आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) उद्घाटनाची चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्धची लढत जिंकून विजयी सुरुवात केलेल्या केकेआरचा (KKR) विजयरथ फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (Royal Challengers Bangalore) संघाने रोखला. बंगळुरविरुद्ध सामन्यात केकेआरचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, कर्णधार श्रेयस अय्यर आपल्या फलंदाजीतून योगदान देण्यात सपशेल अपयशी ठरले.
आता पंजाब किंग्जविरुद्ध (Punjab Kings) आजच्या सामन्यात नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) सज्ज आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण आपल्या फिरकीतून बंगळुरविरुद्ध चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले होते. आता आजच्या सामन्यातून आपली फलंदाजी आणि गोलंदाजी सुधारण्याची संधी कोलकाता संघाला आहे.
मात्र केकेआरचा अनुभवी अष्टपैलू आंद्रे रासेलला बंगळुरविरुद्ध सामन्यात दुखापत झाली होती. अद्याप ही दुखापत कितपत गंभीर आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. रसेल आजच्या सामन्यात खेळू शकला नाही. तर त्याच्याजागी अफगाणिस्तानचा मधल्या फळीतील अष्टपैलू मोहंमद नबीला आजच्या सामन्यात संधी मिळू शकते.
सलामी सामन्यात पंजाब किंग्जने आरसीबीविरुद्ध २०० धावांचा यशस्वी पाठलाग करत स्पर्धेतील आपला पहिला विजय साकारला होता. या सामन्यात शिखर धवन, ओडीन स्मीथ, लियम लिंगविस्टन यांची निर्णायक भूमिका ठरली होती.
तसेच आजच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाने आपला विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातून तो पंजाब किंग्जच्या जर्सीतून पदार्पण करताना दिसेल. आमने सामने २९ पंजाब किंग्ज (Punjab Kings) विजयी १० कोलकाता विजयी १९ यांच्यावर असेल. आयपीएल चाहत्यांची नजर रबाडा, लिंगविस्टन, शिखर धवन, आंद्रे रसेल यांच्यावर असेल.
सलिल परांजपे, नाशिक.