IPL 2022, KKR vs MI : कोलकातासाठी आजचा सामना 'करो या मरो'

IPL 2022, KKR vs MI : कोलकातासाठी आजचा सामना 'करो या मरो'

मुंबई | Mumbai

आयपीएलमध्ये (IPL) आज ५६ वा सामना २०१२-२०१४ आयपीएल हंगामाचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध पाच वेळचा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघांमध्ये होणार आहे....

आयपीएल २०२२ मध्ये बाद फेरीच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखण्यासाठी कोलकाता संघाला विजयाची आज अखेरची संधी आहे. तर आयपीएल २०२२ मध्ये १० सामन्यांमध्ये २ विजय आणि ८ पराभवांसह ४ गुणांची कमाई केलेल्या मुंबई संघाला आज स्पर्धेतील आपला तिसरा विजय संपादन करण्याची संधी आहे.

हा सामना डीवाय पाटील मुंबई येथे होणार आहे. कोलकाता संघाच्या खात्यात ११ सामन्यांमध्ये ४ विजय आणि ७ पराभवांसह ८ गुण आहेत. आता मुंबईवर मात करून आपला पाचवा विजय मिळवण्यासाठी कोलकाता संघाला आज मोठी मेहनत करावी लागणार आहे.

कोलकाता (KKR) आणि मुंबई (MI) संघांमध्ये आतापर्यंत ३० सामने झाले आहेत. यात मुंबईने २२ तर कोलकाताने ८ विजय मिळवले आहेत. मागील ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास मुंबईने ३ तर कोलकाताने २ विजय मिळवले आहेत

कोलकाता संघासाठी हा सामना करो या मरो असा असणार आहे. शिवाय कोलकाता संघाला इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. बंगळूरच्या काल हैद्राबादवरील विजयाने कोलकाता संघाची अडचण वाढली आहे. शिवाय सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. आजच्या सामन्यात रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर हे स्टार प्लेयर्स असतील.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.