KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्स बाद फेरीच्या शर्यतीत टिकणार?

KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्स बाद फेरीच्या शर्यतीत टिकणार?

शारजा | Sharjah

आयपीएल २०२१ च्या (IPL 2021) पहिल्या टप्प्यात ७ सामन्यांमध्ये २ विजय आणि ५ सामन्यात पराभव स्वीकारून अडखळती सुरुवात करणाऱ्या २ वेळच्या आयपीएल चॅम्पियन केकेआरचा (KKR) निर्णायक सामना आज मंगळवारी दुपारी ३:३० वाजता दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) संघाशी होणार आहे...

या सामन्यात विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाविरुद्ध रोमहर्षक सामन्यात अखेरच्या चेंडूवर पराभव स्वीकारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DC) निर्णायक सामन्यात आत्मविश्वासाने पुनरागमन करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) सज्ज आहे.

कोलकाता संघाच्या खात्यात १० सामान्यांमध्ये अवघ्या ४ सामन्यात विजय आणि ६ पराभवांसह ८ गुण जमा आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवून स्पृर्धेतील पाचवा विजय नोंदवण्यासाठी कोलकाता सज्ज आहे.

मात्र शारजा या मैदानावर झालेल्या मागील २ सामन्यात गतवर्षी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जविरुद्ध सामन्यात कोलकाता संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या मैदानावर विजयाचे खाते उघडण्यासाठी ऑईन मॉर्गनचा कोलकाता नाईट रायडर्स उत्सुक आहे.

मात्र दिल्ली कॅपिटल्स संघ यंदाच्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. आता कोलकाता संघावर पुन्हा एकदा विजय संपादन करून आघाडीच्या दोन स्थानांमध्ये झेप घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स उत्सुक आहे.

दोन्ही संघांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रचंड संतुलन असल्यामुळे एक रोमांचक सामना पाहण्याची सुवर्णसंधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. चेन्नईविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघानं पहिल्या ४ षटकात ५०-० अशी धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर कोलकाता २०० चा टप्पा सहज पार करेल असे दिसत होते.

मात्र शुभमन गील आणि युवा डावखुरा सलामीवीर कर्णधार ऑईन मॉर्गन झटपट बाद झाल्यानंतर आक्रमक फलंदाज राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक आणि नितीश राणा यांनी केलेल्या निर्णायक फलंदाजीमुळे कोलकाता संघाला २० षटकात १७१ धावसंख्या उभारून दिली होती.

मात्र चेन्नई संघाचे सलामीवीर फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी संघाला आकर्षक सुरुवात करून दिली. मात्र कोलकाता संघाच्या गोलंदाजांनी चेन्नई एक्स्प्रेसला लगाम लावत ठराविक अंतराने विकेट्स काढत सामन्यात रंगत निर्माण केली होती.

अखेरच्या चेंडूपर्यंत चेन्नईला झुंजवण्यात यशस्वी ठरलेल्या कोलकाता संघाला दिल्ली कॅपिटल्स संघाला हलक्यात घेणं महागात पडू शकत.

दिल्ली कॅपिटल्स संघाने अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे आघाडीचे फलंदाज झटपट गमावले. त्यानंतर माजी कर्णधार श्रेयस अय्यर आणि युवा कर्णधार रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांनी केलेल्या निर्णायक फटकेबाजीमुळे दिल्लीला १५६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिल्यानंतर कांगिसो रबाडा, एन्रिक नोकिया आणि इतर गोलंदाजीमुळे दिल्लीला विजय नोंदवून दिला होता.

चेन्नईविरुद्ध कोलकाता संघाचा धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल याला पायाला गंभीर दुखापत झाली होती. ही दुखापत कितपत गंभीर आहे. हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यामुळे दिल्लीविरुद्ध महत्वपूर्ण सामन्यात आंद्रे रसेल खेळणार का? याचा निर्णय नाणेफेकीच्या दरम्यान स्पष्ट होईल.

आंद्रे रसेल अंतिम ११ मध्ये खेळल्यास कांगिसो रबाडा आणि रसेल यांच्यातील लढत पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी सज्ज आहेत. आयपीएल पहिल्या हाफमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकाता संघाला पराभूत केले होते याचा वचपा काढण्यासाठी कोलकता सज्ज आहे.

सलिल परांजपे, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com