भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; जय शाहांनी जाहीर केले आशिया कपचे वेळापत्रक

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार; जय शाहांनी जाहीर केले आशिया कपचे वेळापत्रक

मुंबई | Mumbai

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) २०२३-२४ या आगामी वर्षातील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे...

आगामी पुरुष आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी संघाचा समावेश एकाच गटात करण्यात आला आहे. स्पर्धेत एकूण १३ साखळी सामने होणार आहेत ४ संघाना उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार आहे.

ही स्पर्धा सप्टेंबर २०२३ मध्ये होणार आहे. या स्पर्धेत ६ संघाचा समावेश असणार आहे. स्पर्धेचं ठिकाण अजूनही गुलदस्त्यात आहे. आगामी आशिया चषकाचं यजमानपद पाकिस्तान भूषवणार आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाला आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये पाठवणार नसल्याचे यापूर्वी जाहीर केलं आहे

या स्पर्धेचं आयोजन दुसऱ्या तटस्थ ठिकाणी करण्यात यावे अशी मागणी बीसीसीआयने आशियाई संघटनेकडे केली आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरोधात पाकिस्तान बोर्डाने आक्रमक भूमिका घेतली होती.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका परिपत्रकातून भारतात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्डकप स्पर्धेवर बहिष्कार टाकू अशी धमकी दिली होती. रमीझ राजायांची अध्यक्षपदावरून यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नजम सेठी यांची निवड करण्यात आली आहे.

आशिया चषकासाठी गटवारी

ग्रुप ए : क्वालिफायर, पाकिस्तान, भारत

गुप बी : श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com