
मुंबई | Mumbai
भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्या आयुष्यात नव्या चिमुकल्या पाहुण्याची आगमन झाले आहे. बुमराहने स्वत: ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. बाळाचा आणि पत्नीचा हात हातात घेऊन बुमराहने फोटो त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर (Social Media) शेअर केला आहे....
जसप्रीत बुमराह ३ सप्टेंबरला आशिया कप (Asia Cup) सोडून भारतात (India) परत आला होता. त्यामुळे बुमराहला काय झाले याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात होते. आशिया कपमध्ये एकही षटक न टाकता तो भारतात परत आला होता. मात्र आता त्याचे उत्तर सर्वांसमोर आले आहे.
जसप्रीत बुमराहने तो बाबा झाल्याचा आनंद त्याच्या एक्स-हँडलवर (X-Handle) शेअर केला असून त्यात लिहिले आहे की, "आमचे छोटे कुटुंब आता थोडे मोठे झाले आहे. आमच्या घरी नवा पाहुणा आल्याने आमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली आहे. बुमराहच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. जसप्रीत बुमराह आणि संजनाने आपल्या मुलाचे नाव (Child's Name) अंगद असे ठेवले आहे.