अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत जगदाळे, यादव यांची सुवर्णकामगिरी तर राठीला कांस्य

अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत जगदाळे, यादव यांची सुवर्णकामगिरी तर राठीला कांस्य

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Jawaharlal Nehru Stadium) सुरू असलेल्या 23 वर्षांखालील पहिल्या आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत (International Athletics Championship) महिलांच्या आणि पुरुषांच्या पाच हजार मिटर स्पर्धेत भोसला खेलो इंडिया व एक्सलन्स सेंटरच्या कोमल जगदाळे (Komal Jagdale) आणि आदेश यादव (Aadesh Yadav) यांनी सुवर्णपदकांची (Gold Medal) कमाई केली तर याच सेंटरच्या अजय राठीला (Ajay Rathi) कांस्य पदकावर (Bronze medal) समाधान मानावे लागले...

स्पर्धेतील यशामुळे सेंटरच्या कोमल जगदाळे, संजीवनी जाधव आणि आदेश यादव हे 2022 मध्ये होणार्‍या अशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. सकाळ सत्रातील पहिलाच दिवस भोसला खेलो इंडिया सेंटरच्या धावपटूंनी गाजवला.

महिलांच्या पाच हजार मीटरमध्ये अपेक्षेप्रमाणे कोमल जगदाळे हिने सुवर्णपदकाची कमाई केली. तीने 16:03.53 इतक्या वेळेची नोंद केली, रौप्य पदक मिळवणारी हरियाणाच्या सोनिका (17:00.46) आणि कांस्य मिळवणारी एस. बाधो (17:40;41) या तिच्यापासून खूप दूर राहिला. आपल्या नियमित सरावाच्या जोरावर कोमलने हे यश संपादन केले.

पुरुष गटात यादव, राठीची बाजी : पुरुषांच्या पाच हजार मीटरमध्ये याच सेंटरच्या आदेश यादवला सुवर्णपदक मिळाले. हे पदक मिळवताना मात्र या गटात चांगली चुरस दिसली. आदेशने 14:12.36 इतक्या वेळेची नोंद केली.

रौप्य पदक मिळवणारा उत्तर प्रदेशचा प्रिन्सकुमारने सुरुवातीला आघाडी घेतली होती, मात्र त्याला ती फार काळ टिकवता आली नाही. अनुभवाच्या जोरावर आदेशने बाजी मारली.

रौप्य पदक विजेत्या प्रिन्सकुमारने 14:17.37 एवढया तर भोसला सेंटरच्या अजय राठीने 14:21.90 इतक्या वेळेची नोंद करत कांस्य पदक आपल्या खिशात घातले. या धावपटूंना भोसला खेलो इंडिया व एक्सलन्स सेंटर, साईचे प्रशिक्षक विजेंदरसिंग यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

No stories found.