
मुंबई । Mumbai
आयपीएलच्या १५ व्या मोसमाची (IPL 2022) मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि १४ वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे.
या सामन्यातील विजेत्या टीमला २० कोटी तर उपविजेत्या टीमला १३ कोटी मिळणार आहे. दुसरीकडे पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपये बक्षीस रक्कम दिलं जाणार आहे. दुसरीकडे, उदयोन्मुख खेळाडू (इमेर्जिंग प्लेअरला) २० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
पहिल्यांदा आयपीएलचे पहिल्या मोसमात म्हणजे २००८ मध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघ विजेता ठरला होता. शेन वॉर्नच्या संघाला त्यावेळी ४.८ कोटी रुपये मिळाले होते. आताची बक्षिसाची रक्कम जवळपास चौपट झाली आहे. (IPL 2022 Prize Money)