IPL च्या मैदानात चिअर करताना दिसणार नाहीत 'या' सुंदरी!
क्रीडा

IPL च्या मैदानात चिअर करताना दिसणार नाहीत 'या' सुंदरी!

19 सप्टेंबरपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. मात्र यंदा कोरोनामुळे खेळाडूंसाठी कडक नियम असतील. परिणामी यावेळी खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी आणि मुलं नसणार आहेत.

Rajendra Patil

आयपीएलमध्ये खेळाडूंबरोबर त्यांचा चिअर करण्यासाठी त्यांच्या पत्नीही उपस्थित असतात. मात्र यावेळी कोरोनामुळे खेळाडूंनी कुटुंबाला सोबत घेऊन न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं यंदा मैदानात खेळाडूंच्या या सुंदर पत्नी दिसणार नाहीत.

साक्षी कोरोनामुळे युएइला जाणार नाही आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार खेळाडूंना आपल्या सोबत कुटुंबाला घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे यावेळी चेन्नई सुपरकिंग्जच्या डगआउटमध्ये साक्षी आणि झिवा दिसणार नाही.

भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची Mahendra Singh Dhoni पत्नी साक्षी प्रत्येक क्रिकेट सामन्यात संघाला आणि धोनीला सपोर्ट करण्यासाठी मैदानात लेक झिवासोबत असते.

कोरोनामुळे अभिनेत्री अनुष्का शर्माही युएइमध्ये जाणार नसल्याची शक्यता आहे. बीसीसीआयनं जारी केलेल्या नियमांनुसार खेळाडूची सहावेळा कोरोना चाचणी होणार आहे. त्यामुळे यंदा खेळाडूंनी कुटुंबाला सोबत न घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही पत्नी रितीका आणि मुलगी समायरा यांनी युएला घेऊन जाणार नाही आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणारा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवनही आपल्या कुटुंबाला युएइला घेऊन जाणार नाही आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये धवनची पत्नी आयेशा आणि मुलगा झोरावर कायम असतात.

कोरोनामुळे यंदा आयेशा आणि झोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या डगआउटमध्ये दिसणार नाहीत.

चेन्नई संघाच्या इतर खेळाडूंप्रमाणेतच हरभजनही गीता आणि लेकीला घेऊन जाणार नाही आहे. त्यामुळे गीता मैदानात दिसणार नाही.

भारताचा टॉप फिरकीपटू आर अश्विनची पत्नी प्रीती नारायणा कायम अश्विनला सपोर्ट करण्यासाठी आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात हजर असते. मात्र यावेळी प्रीतीही हजर नसण्याची शक्यता आहे.

कृणालची पत्नी पंखूरी आयपीएलमध्ये दिसणार नाही. तर हार्दिक नुकताच बाबा झाल्यामुळे त्याची पत्नी नताशाही युएइमध्ये हजर नसेल.

भारताचा कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि राजस्थान संघाचा कर्णधार अजिंक्य राहणेची पत्नी राधिकाही यावेळी आयपीएलमध्ये दिसणार आहे. अजिंक्य रहाणे लेक आर्याच्या उपस्थित खेळण्यात उत्सुक होता, मात्र कोरोनामुळे आर्या आणि राधिका उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

कोलकाता नाइट रायडर्स संघाचा स्टार फलंदाज मनोज तिवारी गेल्या काही वर्षापासून भारतीय संघापासून दूर असला तरी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करत असतो. मनोजला कायम पाठिंबा देण्यासाठी त्याची पत्नी सुश्मीता रॉय कायम त्याच्यासोबत असते.

क्रिकेटच्या मैदानातही सुश्मीता रॉय मनोज तिवारीला चिअर करताना दिसते, मात्र यंदा सुश्मीता मैदानात दिसणार नाही.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा आणि CSKचा आघाडीचा फलंदाज सुरैश रैना नुकताच बाबा झाला. सुरैशला सपोर्ट करण्यासाठी त्याची पत्नी प्रियंका गेल्या वर्षी आयपीएलमध्ये दिसली होती, मात्र यावेळी प्रियंका आयपीएलमध्ये दिसणार नाही.

ऱॉबिनची पत्नीचे फोटो गेल्यावर्षी आयपीएलमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. मात्र यावेळी कोरोनामुळे गौतमी आयपीएलमध्ये दिसणार नाही.

रवींद्र जडेजा नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी ओळखला जातो. मात्र त्याला कायम साथ देणारी त्याची पत्नी रिवा सोलंकी त्याला आयपीएलमध्ये साथ देताना दिसणार नाही.

रितीका कायम मुंबई इंडियन्स संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात असते, मात्र यावेळी चिअर करताना रितीका दिसणार नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com