<p>चेन्नई l Channai </p><p>बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नई मध्ये सुरु आहे. या लिलावाची सध्या क्रिकेट जगतात चांगलीच चर्चा आहे. </p>.<p>गेल्या काही दिवसांपासून बड्या क्रिकेटपटूंसोबत साऱ्या क्रीडाप्रेमींचं या लिलावाकडे लक्ष लागलं आहे. जगभरातील तब्बल २९२ खेळाडू या लिलावात नशीब आजमावत आहेत.</p>.<p>दरम्यान, ख्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले आहे. त्याने युवराजचा १६ कोटींचा विक्रम मोडला आहे.</p>