IPL 2023 : पंजाबचे किंग्ज आज लखनौशी भिडणार, लखनौ पराभवाचा वचपा काढणार का?

IPL 2023 : पंजाबचे किंग्ज आज लखनौशी भिडणार, लखनौ पराभवाचा वचपा काढणार का?

मोहाली | Mohali

आयपीएल १६ मध्ये शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी ३८ वा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध पंजाबकिंग्ज संघांमध्ये सायंकाळी ७:;३० वाजता होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे. हा सामना पंजाबकिंग्ज संघाच्या घरच्या मैदानावर मोहाली येथे खेळवण्यात येणार आहे.

लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी मैदानावर दोन्ही संघांमध्ये झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात पंजाबकिंग्ज संघाने लखनौ सुपरजायंट्स संघाचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी लखनऊ सज्ज असणार आहे. आयपीएल स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना होणार आहे. आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ विजय संपादन केला आहे.

IPL 2023 : पंजाबचे किंग्ज आज लखनौशी भिडणार, लखनौ पराभवाचा वचपा काढणार का?
आता एकाच नंबरवरून चालणार चार मोबाईलमध्ये WhatsApp... कसं सुरू करायचं?

पंजाबकिंग्ज संघाचा नियमित कर्णधार शिखर धवन या सामन्यातून आयपीएल स्पर्धेच्या उर्वरीत सामन्यांसाठी संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. पंजाबकिंग्ज संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघावर मात करून विजयी लय प्राप्त केली आहे.

IPL 2023 : पंजाबचे किंग्ज आज लखनौशी भिडणार, लखनौ पराभवाचा वचपा काढणार का?
"अजित पवारांचे बॅनर अन् संजय राऊतांचं भाकीत" यावर शरद पवार काय म्हणाले?

आता लखनौ आणि पंजाबकिंग्ज स्पर्धेतील आपला पाचवा विजय संपादन करण्यासाठी आणि अव्वल ४ संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक असणार आहे. आयपीएल गुणतालिकेवर नजर टाकल्यास पंजाबकिंग्ज ४ विजय आणि ३ पराभवांसह सहाव्या स्थानावर आहे. तर लखनौ सुपरजायंट्स संघाच्या खात्यातही ४ विजय आणि ३ पराभवांसह ८ गुण आहेत,

IPL 2023 : पंजाबचे किंग्ज आज लखनौशी भिडणार, लखनौ पराभवाचा वचपा काढणार का?
अजितदादांनी शरद पवारांनाही कन्फ्यूज केले

लखनौ संघाचे कर्णधारपद लोकेश राहुलकडे असणार आहे. पंजाबकिंग्ज लखनऊ सुपरजायंट्स संघाला दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असणार आहे. मोहाली क्रिकेट मैदानावर आजवर ५७ आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २५ तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ ३२ सामन्यात विजयी झाला आहे.

पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६६ असून , दुसऱ्या डावातील स्कोर १५५ इतका आहे. आयपीएल स्पर्धेत एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या नावावर आहे. २००८ साली पंजाबकिंग्ज विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकात चेन्नईने २४० धावा केल्या होत्या., मैदानावरील सर्वात नीचांकी धावसंख्या ६७-१० दिल्ली कॅपिटल्स.

IPL 2023 : पंजाबचे किंग्ज आज लखनौशी भिडणार, लखनौ पराभवाचा वचपा काढणार का?
"अजित पवारांचे बॅनर अन् संजय राऊतांचं भाकीत" यावर शरद पवार काय म्हणाले?

मोहाली मैदानावर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पंजाबकिंग्ज संघाचा माजी फलंदाज शॉन मार्शच्या नावावर आहे. त्याने २८ सामन्यात २७ डावांमध्ये सर्वाधिक १०६४ धावा केल्या आहेत. सर्वाधिक बळी पीयूष चावला २८ सामने २४ विकेट्स.

सलिल परांजपे, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com