IPL 2023 : हैदराबाद-कोलकातामध्ये आज चुरशीची लढत

IPL 2023 : हैदराबाद-कोलकातामध्ये आज चुरशीची लढत

हैदराबाद | Hyderabad

आयपीएलमध्ये (IPL 2023) गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाशी होणार आहे. हा सामना हैदराबाद संघाच्या घरच्या मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे...

बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघाचा इरादा असणार आहे. हैद्राबाद संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघावर विजय मिळवला आहे . आता कोलकाता संघावर मात करून विजयी चौकार मारण्यासाठी हैदराबाद सज्ज आहे. सलग ५ सामन्यांची मालिका खंडित करून कोलकाता संघाने बंगळूर संघावर विजय मिळवत विजयी मार्गावर आपण पुन्हा एकदा परतलो असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

IPL 2023 : हैदराबाद-कोलकातामध्ये आज चुरशीची लढत
राजीनामा मागे घेण्याच्या मागणीवर शरद पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाले, "एक ते दोन दिवसात..."

मात्र गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पराभव झाल्यामुळे कोलकाता संघाची अडचण वाढली आहे. बाद फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी कोलकाता संघाला आपले उर्वरीत ५ सामने जिंकावे लागणार आहेत. आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता येथे झालेल्या सामन्यात हैद्राबाद संघाने कोलकाता संघावर मात केली होती.

IPL 2023 : हैदराबाद-कोलकातामध्ये आज चुरशीची लढत
नाशिकमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात; हवामान विभागाचा काय आहे अंदाज? जाणून घ्या

या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाता उत्सुक असेल. कोलकाता आणि हैदराबाद संघाचा १० वा सामना असेल. आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये २४ सामने झाले आहेत कोलकाता संघाने १५ तर हैद्राबाद संघाने ९ सामन्यात विजय संपादन केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

IPL 2023 : हैदराबाद-कोलकातामध्ये आज चुरशीची लढत
सल्ला पचनी पडला नाही तर...; शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया

गुजरातविरुद्ध लढतीतील पराभव मागे सारून विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी कोलकाता सज्ज असेल. तर आपली विजयी मोहीम अशीच कायम राखण्यासाठी हैदराबाद सज्ज असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com