IPL-2023 : RR vs CSK - राजस्थानचा चेन्नईवर विजय

IPL-2023 : RR vs CSK - राजस्थानचा चेन्नईवर विजय

चेन्नई | वृत्तसंस्था Chennai

चेन्नईतील एम. ए. चिदंबरम मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज IPL-2023 चा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. यात राजस्थानच्या संघाने बाजी मारली.

नाणेफेक जिंकून चेन्नईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघाकडून यशस्वी जयस्वाल व जॉस बटलर सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या दुसऱ्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने यशस्वी जयस्वालला झेल बाद केले.यशस्वीने ८ चेंडूत १० धावा केल्या.नवव्या षटकात रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर डेव्हन काॅॅन्वेने देवदत्त पडिक्कलला झेल बाद केले. देवदत्तने २६ चेंडूत ५ चौकार लगावत ३८ धावा केल्या. पाठोपाठ रविंद्र जाडेजाने संजू सॅॅमसनला त्रिफळाचीत करत शून्य धावावर तंबूत पाठविले.

१५ व्या षटकात आकाश सिंघच्या गोलंदाजीवर सी. मगालाने रविन्द्र्चंद्रन आश्विनला झेल बाद केले.रविन्द्र्चंद्रनने २२ चेंडूत २ षटकार व १ चौकार लगावत एकूण ३० धावा केल्या. सलामीला आलेल्या जोस बटलरने ३६ चेंडूत ३ षटकार व १ चौकार लगावत एकूण ५२ धावा करत अर्धशतक पूर्ण केले.मोईन अलीने जोस बट्लरला त्रिफळाचीत केले. ध्रुव जुरेल ४ धावा करत शिवम दुबे करवी झेल बाद झाला. तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर डेव्हन काॅॅन्वेने जेसन होल्डरला झेल बाद करत शून्य धाव संख्येवर माघारी पाठविले. शिमराॅॅन हेटमायरने तुफान फलंदाजी करत १८ चेंडूत २ चौकार व २ षटकार लगावत नाबत ३८ धावा केल्या. विसाव्या षटका अखेरीस राजस्थानच्या संघाने ८ गडी बाद १७५ धावा केल्या.

चेन्नईच्या संघाकडून ऋतुराज गायकवाड व डेव्हन काॅॅन्वे प्रथम फलंदाजीस आले. सामन्याच्या तिसऱ्या षटकात संदीप शर्माच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालने ऋतुराज गायकवाडला झेल बाद करत चेन्नईच्या संघास पहिला धक्का दिला. ऋतुराजने १० चेंडूत ८ धावा केल्या. सामन्याच्या दहाव्या षटकात रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे पायचीत झालाअजिंक्य रहाणेने १९ चेंडूत ३१ धावा केल्या. पाठोपाठ रविचंद्रनच्या गोलंदाजीवर शिवम दुबे पायचीत झाला.शिवम दुबेने ९ चेंडूत ८ धावा केल्या. संदीप शर्माने मोईन अलीला ७ धावांवर झेल बाद करत माघारी पाठविले. हेटमायरने अंबाती रायडूला झेल बाद केले. अंबाती रायडू ने २ चेंडूत १ धाव केली.

रविंद्र जाडेजा व महेंद्रसिंग धोनीच्या जोडीने आक्रमक फलंदाजी केली. महेंद्रसिंग धोनीने १७ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या तर रविंद्र जाडेजाने १५ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या. विसाव्या षटका अखेरीस चेन्नईचा संघ १७२ धावा पर्यंत मजल मारू शकला.

राजस्थानच्या संघाने चेन्नईच्या संघावर ३ धावांनी विजय मिळवला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com