IPL 2023 : आज आयपीएलमध्ये अखेरचा डबल धमाका; 'हे' संघ भिडणार

IPL 2023  : आज आयपीएलमध्ये अखेरचा डबल धमाका; 'हे' संघ भिडणार

मुंबई | Mumbai

आयपीएलमधील (IPL) अखेरचा डबल हेडर सामना रविवारी २१ मे २०२३ रोजी खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना ५ वेळचा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी ३:३० वाजता खेळवण्यात येणार आहे...

बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाला सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय संपादन करावा लागणार आहे.

आजच्या सामन्याच्या निकालावर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals), पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाचे आवर्जून लक्ष असणार आहे.

IPL 2023  : आज आयपीएलमध्ये अखेरचा डबल धमाका; 'हे' संघ भिडणार
आगीत लाखोंची हानी; नुकसान भरपाईची मागणी

आयपीएल २०२३ चा (IPL 2023) शेवटचा डबल हेडर सामना आज होणार असल्यामुळे आजच्या सामन्यांच्या निकालवर आयपीएल चाहत्यांचे आवर्जून लक्ष असणार आहे. आयपीएल २०२३ चा दुसरा डबल हेंडर सामना गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (Royal Challengers Bangalore) संघांमध्ये होणार आहे. हा सामना बंगळूरच्या एम चिन्नास्वामी मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे.

IPL 2023  : आज आयपीएलमध्ये अखेरचा डबल धमाका; 'हे' संघ भिडणार
मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.संजीव सोनवणे यांची निवड

बंगळूर संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात सनराईझर्स हैदराबाद संघाचा ८ गडी राखून पराभव केल्यामुळे बाद फेरीच्या स्थानासाठी बंगळूर संघाने आपला दावा अधिक मजबूत केला आहे. गुजरात टायटन्स संघाने बंगळूरला पराभूत केल्यास आणि पहिल्या सामन्यात हैदराबाद संघाकडून मुंबई इंडियन्स संघाचा पराभव झाल्यास कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स, आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यापैकी एका संघाचा बाद फेरीतील प्रवेश सरस नेट रनरेटच्या जोरावर निश्चित होणार आहे.

मुंबई इंडियन्स, आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघांनी आपल्या अखेरच्या लढतीत विजय संपादन केल्यास दोन्ही संघाचे १६ गुण होतील. ज्या संघाची धावगती अधिक सरस असेल त्याला बाद फेरीचे तिकीट मिळणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि आणि हैदराबाद संघांनी आपला अखेरचा सामना गमावला आहे. आजच्या सामन्यात विजय संपादन करून आयपीएल २०२३ ची विजयी सांगता करण्यासाठी हैदराबाद सज्ज असेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

IPL 2023  : आज आयपीएलमध्ये अखेरचा डबल धमाका; 'हे' संघ भिडणार
भाजपचे मिशन 'मुंबई १५०'

तर यंदाच्या हंगामात हैदराबाद संघावर सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी आणि बाद फेरीतील आपले आव्हान कायम राखण्यासाठी मुंबई सज्ज असेल. बंगळूर आणि गुजरात संघांनी आपला अखेरचा सामना जिंकला आहे . त्यामुळे आजच्या सामन्यात विजय संपादन करून बाद फेरीत आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असणार आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com