IPL 2023 : MI vs GT- गुजरातचा संघ अंतिम सामन्यात

मुंबईचा ६२ धावांनी पराभव
IPL 2023 : MI vs GT- गुजरातचा संघ अंतिम सामन्यात

अहमदाबाद | वृत्तसंस्था

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम वर आज आयपीएल २०२३ चा कवालिफायर -२ सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियनच्या संघात खेळण्यात आला. यात गुजरातच्या संघाने बाजी मारली. यात गुजरातच्या संघाने विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात यांच्यात अंतिम लढत होऊन IPL-2023 चा विजेता ठरणार आहे.

नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या संघाकडून वृद्धिमान शहा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या सातव्या षटकात पियुष चावलाच्या गोलंदाजीवर ईशान किशनने वृद्धिमान शहाला यष्टीचीत केले. वृद्धिमान शहाने १६ चेंडूत १८ धावा केल्या.

शुभमन गिलने धडाकेबाज फलंदाजी केली. १७ व्या षटकात आकाश मढवळच्या गोलंदाजीवर टिम डेविडने शुभमन गिलला झेल बाद केले. शुभमन गिलने ६० चेंडूत १० षटकार व ४ चौकार लगावत एकूण १२९ धावा केल्या. साई सुदर्शनने ३१ चेंडूत ४३ धावा करत १९ व्या षटकात दुखापत झाल्याने माघारी परतला.

कर्णधार हार्दिक पांड्याने १३ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या तर रशीद खानने २ चेंडूत नाबाद ५ धावा केल्या. गुजरातच्या संघाने २० व्या षटकाअंती ३ गडी बाद २३३ धावा केल्या.

मुंबईच्या संघाची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात मोहमद शामीच्या गोलंदाजीवर वृद्धिमान शहाने नेहल वाधेराला झेल बाद करत ४ धावांवर बाद करत मुंबईच्या संघास पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकात मोहमद शामीच्या गोलंदाजीवर जोशुआ लिटलने कर्णधार रोहित शर्माला झेल बाद केले. रोहित शर्माने ७ चेंडूत ८ धावा केल्या.

सहाव्या षटकात रशीद खानने टिळक वर्माला त्रिफळाचीत केले. टिळक वर्माने १४ चेंडूत ४३ धावा केल्या. सामन्याच्या १२व्या षटकात जोशुआ लिटलने कॅॅमेराॅॅन ग्रीनला त्रिफळाचीत करत मुंबईच्या संघास चौथा धक्का दिला. कॅॅमेराॅॅन ग्रीनने २० चेंडूत ३० धावा केल्या.

सामन्याच्या १५ व्या षटकात मोहित शर्माने सुर्यकुमार यादवला त्रिफळाचीत केले. सुर्यकुमार यादवने ३८ चेंडूत ६१ धावा केल्या.पाठोपाठ विष्णू विनोदही हार्दिक पांड्याकडून झेल बाद होत ५ धावांवर तंबूत परतला. १५व्या षटकात ६ गडी बाद १५६ धावा अशी स्थिती मुंबईच्या संघाची होती. रशीद खानच्या गोलंदाजीवर टिम डेविड पायचीत होत अवघ्या २ धावांवर माघारी परतला. साई सुदर्शनने क्रिस जोर्डनला झेल बाद करत २ धावांवर तंबूत पाठविले. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर डेविड मिलरने पियुष चावलास शून्यावर झेल बाद केले. एकोनाविसाव्या षटकात सर्व खेळाडू बाद १७१ धावा पर्यंत मुंबईच्या संघाने केल्या.

गुजरातच्या संघाने ६२ धावांनी मुंबईच्या संघावर विजय मिळविला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com