IPL-2023 : GT vs DC - गुजरातचा दिल्लीवर विजय

साई सुदर्शन व डेविड मिलरची आक्रमक फलंदाजी
IPL-2023 : GT vs DC - गुजरातचा दिल्लीवर विजय

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

नवी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट मैदानावर गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या IPL-2023 चा क्रिकेटचा सामना आज खेळण्यात आला. यात साई सुदर्शन व डेविड मिलरच्या आक्रमक फलंदाजीने गुजरातच्या संघाने बाजी मारली.

गुजरात टायटन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघाकडून कर्णधार डेविड वॉर्नर व पृथ्वी शाॅॅ सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या तिसऱ्या षटकात मोहमद शमीच्या गोलंदाजीवर अल्जारी जोसेफने पृथ्वी शाॅॅला झेल बाद केले.पृथ्वी शाॅॅने ५ चेंडूत ७ धावा केल्या. मिचेल मार्श मैदानात फार वेळ टिकला नाही मोहमद शमीने मिचेल मार्शला अवघ्या ४ धावांवर झेल बाद करत माघारी पाठविले.

कर्णधार डेविड वॉर्नरने सामन्याच्या सुरुवाती पासूनच आक्रमक फलंदाजीस सुरवात केली. परंतु नवव्या षटकात अल्जारी जोसेफने डेविड वॉर्नरला क्लीन बोल्ड केले.वॉर्नरने ३२ चेंडूत ७ चौकार लगावत एकूण ३७ धावा केल्या. वॉर्नरच्या पाठोपाठ रॉयली रासूही पहिल्याच चेंडूत झेल बाद होत शून्यावर माघारी परतला. अल्जारी जोसेफच्या गोलंदाजीवर राहुल तेवतीयाने रॉयली रासूला झेल बाद केले. १० व्या षटकात ४ गडी बाद ७८ धावा अशी स्थिती दिल्लीच्या संघाची होती. रशीद खानने अभिषेक पोरेल क्लीन बोल्ड केले.अभिषेकने ११ चेंडूत २० धावा केल्या. सरफराज खानने ३४ चेंडूत ३० धावा करत जे. लिटल कडून झेल बाद झाला.अक्षर पटेलने २२ चेंडूत ३ षटकार व २ चौकार लगावत ३६ धावा केल्या.मोहमद शमीच्या गोलंदाजीवर डेविड मिलरने अक्षर पटेल ला झेल बाद केले.

विसाव्या षटका अखेर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ८ गडी बाद १६२ धावा केल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दिल्लीच्या संघाने दिलेल्या १६३ धावांचे आवाहन पार करताना गुजरातच्या संघाकडून वृद्धिमान शहा व शुभमन गिल प्रथम फलंदाजीस आले. सामन्याच्या चौथ्या शतकाच्या सुरवातीस एनरिच नॉर्टजेने वृद्धिमान शहाला क्लीन बोल्ड केले.वृद्धिमानने ७ चेंडूत १४ धावा केल्या.तर पाचव्या षटकात एनरिच नॉर्टजेने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले.शुभमनने १३ चेंडूत १४ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या अवघ्या ५ धावांवर झेल बाद होऊन तंबूत परतला.खलील अहमदच्या गोलंदाजीवर अभिषेक पोरेलने हार्दिकला झेल बाद केले.

सामन्याच्या १५ व्या षटकात विजय शंकरला मिचेल मार्शने पायचीत केले. विजय शंकरने २३ चेंडूत २९ धावा केल्या. साई सुदर्शनने ४८ चेंडूत ६२ धावा केल्या तर डेविड मिलरने आक्रमक खेळी करत १६ चेंडूत ३१ धावा केल्या. गुजरातच्या संघाने दिल्लीच्या संघावर ६ गडी राखून ११ व चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळविला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com