IPL 2023 Final : चेन्नईने कोरले पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव; गुजरातचा दारूण पराभव

IPL 2023 Final : चेन्नईने कोरले पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव; गुजरातचा दारूण पराभव

अहमदाबाद | Ahmedabad

आयपीएल २०२३ च्या (IPL 2023) अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सामना चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) झाला. हा सामना रविवारीच होणार होता. मात्र, २८ मे चा दिवस पावसाने वाहून गेल्याने हा सामना राखीव दिवशी खेळला गेला...

चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजाने मोहित शर्माच्या शेवटच्या षटकातील दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत रोमहर्षक विजय मिळवला.

IPL 2023 Final : चेन्नईने कोरले पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव; गुजरातचा दारूण पराभव
Nashik Crime : जेलरोडला धारदार शस्त्राने एकाचा खून

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पावसाने बराच वेळ व्यत्यय आणला. मात्र या सामन्यात अखेर एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला.

चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल इतिहासात पाच वेळा चॅम्पियन ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात विजेतेपद आपल्याकडे राखता आले नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

IPL 2023 Final : चेन्नईने कोरले पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव; गुजरातचा दारूण पराभव
चोरट्याचा किराणा दुकानावर डल्ला

शुबमन गिल व ऋद्धिमान साहा या जोडीने संघाला पुन्हा एकदा अर्धशतकी सलामी दिली. गिलने ३९ तर साहाने ५४ धावांचे योगदान दिले. मात्र, गुजरातच्या डावाचा नायक युवा साई सुदर्शन हा ठरला. त्याने ४७ चेंडूवर ९६ धावांची शानदार खेळी केली.

त्याच्या योगदानामुळे गुजरातने ४ बाद २१४ धावा केल्या. साई सुदर्शनने गुजरातकडून सर्वाधिक ९६ धावा केल्या. चेन्नईचे सर्व गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. पाथिरानाने दोन गडी बाद केले. चहर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

चेन्नईकडून कॉनवेने सर्वाधिक ४७ धावा केल्या, पण सर्व फलंदाजांनी चांगले योगदान दिले. गुजरातकडून मोहित शर्माने तीन आणि नूरने दोन विकेट घेतल्या. रवींद्र जडेजाने थरारक सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंत १० धावा चोपून विजय मिळवून दिला.

IPL 2023 Final : चेन्नईने कोरले पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव; गुजरातचा दारूण पराभव
Nashik Crime : गायींना इंजेक्शन देऊन करायचे बेशुद्ध अन्...; दोघांना अटक
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com