IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स-चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज लढत, कोण जिंकणार सामना?

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स-चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज लढत, कोण जिंकणार सामना?

चेन्नई | Chennai

आयपीएलमध्ये (IPL) आज बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाशी चेन्नईच्या एम ए चिदंबरम चेपॉक मैदानावर सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे...

आयपीएल १६ मध्ये ५५ वा सामना दोन्ही संघांमध्ये होणार आहे. आयपीएल २०२३ च्या बाद फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. आयपीएल गुणतालिकेत चेन्नई सुपरकिंग्ज दुसऱ्या स्थानावर आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या खात्यात १३ गुण आहेत. बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी चेन्नईला ३ पैकी २ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून आयपीएल २०२३ मधील सातवा विजय संपादन करून अव्वल २ संघांमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज उत्सुक आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खात्यात ४ विजय आणि ६ पराभवांसह ८ गुण आहेत.

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स-चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज लढत, कोण जिंकणार सामना?
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभेसाठी मतदानाला सुरूवात, कोणाला मिळणार सत्तेचा मुकूट?

बाद फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी दिल्लीला आपल्या उर्वरीत ४ सामन्यात मोठ्या फरकाने विजय संपादन करावा लागणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून आपला पाचवा विजय मिळवून बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी डेविड वॉर्नर अँड कंपनीला आज अखेरची संधी असणार आहे. आजच्या सामन्यात दिल्लीचा पराभव झाल्यास दिल्लीला साखळीतच आयपीएल २०२३ मधून पॅकअप करावे लागणार आहे.

दिल्ली आणि चेन्नई संघांनी आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्स संघावर मात केली आहे. दिल्लीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरवर विजय मिळवला आहे. चेन्नईच्या चिदंबरम चेपॉकच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, या खेळपट्टीवर कायमच फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले आहे. अनेक फिकीपटूंनी या खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजीच्या बळावर अनेक विकेट्स काढल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघांमध्ये २७ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. चेन्नईने १७ तर दिल्लीने १० सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघांनी आपल्या अखेरच्या सामन्यात विजय संपादन केल्यामुळे आजच्या सामन्यात संघबदल कमी करण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्स-चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आज लढत, कोण जिंकणार सामना?
Samruddhi Mahamarg : मोठी बातमी! समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला

दिल्लीच्या ताफ्यात अक्षर पटेल , कुलदीप यादवसारखे गोलंदाज आहेत. चेन्नईच्या संघात महेश तिक्षाणा आणि रविंद्र जडेजा असल्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ कोणावर वरचढ ठरतो ? ते पाहणे महत्वाचे असणार आहे. दोन्ही संघाच्या आयपीएल २०२३ मधील कामगिरीवर नजर टाकल्यास, चेन्नई संघाची कामगिरी अधिक सरस असल्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाला विजयासाठी सर्वाधिक संधी असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com