IPL 2023 : चेन्नई-राजस्थानमध्ये आज चुरशीची लढत; कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या

IPL 2023 : चेन्नई-राजस्थानमध्ये आज चुरशीची लढत; कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या

जयपूर | Jaipur

आयपीएलमध्ये गुरुवारी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाचा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाशी होणार आहे हा सामना सायंकाळी ७:३० वाजता जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे...

आयपीएल २०२३ मध्ये (IPL 2023) गुणतालिकेत आपले अव्वल स्थान कायम राखण्याचा चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा प्रयत्न असणार आहे. आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई येथे पार पडून गेलेल्या पहिल्या साखळी सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्स संघाने धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघावर ३ धावांनी थरारक विजय संपादन केला होता.

या पराभवाची दुसऱ्यांदा पुनरावृत्ती करण्यासाठी राजस्थान रॉयल्स स्पर्धेतील आपला पाचवा विजय संपादन करण्यासाठी मैदानात उतरेल. तर मागील २ सामन्यात सनराईझर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघावरील विजयामुळे चेन्नई सुपरकिंग्ज विजयी षटकार मारण्यासाठी आणि गुणतालिकेत आपले अव्वलस्थान अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक असणार आहे.

IPL 2023 : चेन्नई-राजस्थानमध्ये आज चुरशीची लढत; कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या
नाशिकमध्ये आयकरची सर्वात मोठी कारवाई; तब्बल तीन हजारांहून अधिक कोटींचे घबाड लागले हाती

दोन्ही संघाची कामगिरी पाहता राजस्थान रॉयल्स संघाला लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघांविरुद्ध सलग २ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे पराभवाची हॅट्रिक टाळण्यासाठी राजस्थान रॉयल्स सज्ज असणार आहे.

IPL 2023 : चेन्नई-राजस्थानमध्ये आज चुरशीची लढत; कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या
Video : काळ आला होता पण वेळ आली नव्हती! 30 फूटांवरुन चिमुकली कोसळली अन् पुढे घडलं असं काही...

दोन्ही संघांनी आयपीएल २०२३ मध्ये ७ सामने खेळले असून, राजस्थान रॉयल्स संघाने ४ विजय आणि ३ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. याउलट चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ७ पैकी ५ सामन्यात विजय संपादन केला आहे.

तर २ सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. दोन्ही संघांची नजर विजयावर असणार आहे. आयपीएल इतिहासात चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघांमध्ये २७ सामने झाले असून, यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा वरचष्मा राहिला आहे. चेन्नई संघाने १५ तर राजस्थान रॉयल्स संघाने १२ सामन्यात चेन्नईवर मात केली आहे.

IPL 2023 : चेन्नई-राजस्थानमध्ये आज चुरशीची लढत; कशी आहे खेळपट्टी? जाणून घ्या
वेगवेगळ्या अपघातात सहा जण जखमी

खेळपट्टीचा अहवाल :

जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर एकूण ४६ आयपीएल सामने खेळवण्यात आले असून, यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ केवळ १५ सामन्यात विजयी झाला आहे. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ३१ सामन्यात विजय संपादन केला आहे. यामध्ये मात्र आजवर झालेल्या सामन्यात कोणत्याही संघाला धावफलकावर २०० ही धावसंख्या उभारता आलेली नाही.

२०१९ मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईझर्स हैद्राबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैद्राबाद संघाने २० षटकात १६० धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघाने हैद्राबादविरुद्ध ७ गडी राखुन विजय संपादन केला होता.

याशिवाय जयपूरची खेळपट्टी गोलंदाजांसाठी वरदान राहिली आहे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५७ इतकी आहे. सर्वाधिक धावसंख्या राजस्थान रॉयल्स १९७-१ नीचांकी धावसंख्या मुंबई इंडियन्स ९४-९.

सलिल परांजपे, नाशिक.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com